
एकुलता एक मुलगा गेला,पण लेकीला वाचविण्यासाठी कुटुंबाची धडपड!
(पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडी येथील घटना,शासनाच्या मदतीचा मिळाला आधार)
भविष्याचा वेध घेण्यासाठी शाळेला निघालेल्या भाऊ आणि बहिणीचा अपघात झाला 13 वर्षाचा भाऊ डोळ्यादेखत जीवाशी मुकला आणि 14 वर्षीय बहीण गंभीर जखमी झाली शासनाच्या आर्थिक मदतीने देठे कुटुंबाची लेकीला वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे ही घटना धोंडेवाडी ता पंढरपूर येथील तानाजी देठे यांच्या मुलाची आहे
येथील तानाजी देठे तुटपुंजी शेती आणि दूध व्यवसायातून पत्नी आणि एक मुलगा व एक मुलगी यांचा हलकीच्या परिस्थितीत उदरनिर्वाह करीत होते देठे यांना राधिका आणि चैतन्य अशी दोन मुले चैतन्य सातवीत तर राधिका आठवीत शिकत होती मागील 10 दिवसांपूर्वी राधिका भाऊ चैतन्यच्या हाताला धरून शेळेत भविष्याची स्वप्ने रंगवीत घेऊन पायी चालत निघाली होती अशातच टिपरने दोघांना जोरदार धडक दिली आणि भाऊ चैतन्यवर काळाने घाला घातला आणि घडकेत जागीच मरण पावला काळ आला होता पण वेळ चांगली असल्याने मरणाच्या दाढेतून वाचलेल्या राधिका आणि चैतन्य याला नागरिकांनी त्वरित उपचारासाठी पंढरपूर येथे हलविले परंतु उपचारापूर्वीच चैतन्याचा मृत्यू झाला असल्याने डॉक्टरांनी सांगितले आणि एकुलता एक पोटचा गोळा गेल्याने आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकल्या प्रमाणे अवस्था निर्माण झाली वडील तानाजी यांना नातेवाईक आणि मित्रपरिवारांनी आधार दिला मुलगी राधिका गंभीर जखमी झाली असून तीच्या पायाच्या मांड्याच्या नसा निकामी झाल्या आहेत डॉकटरांनी राधिकाला पुढील उपचारासाठी मिरज येथे हलविले परंतु शत्रक्रिया जोखमीची होती त्यामुळे उपचारासाठी जास्तीचे पैसे लागणार असले तरी तानाजी यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने उपचार कसे करायचे या विवंचनेत असताना राधिकाला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविणे गरजेचे होते तानाजी यांनी काळजावर दगड ठेवून राधिकाला पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले तेथील डॉक्टरांनी तिला बारा लाख रुपये पर्यंत खर्च सांगितला आहे मागील सहा दिवसांपासून राधिकावर उपचार सुरू आहे शिवाय पुढे दोन महिने तिला रुग्णालयात उपचार घ्यावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले