
अंकोली येथे सुनीलदादा चव्हाण यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ!
(अंकोली व औढी गावासाठी इथून पुढे माझ्याकडून कुठल्याही निधीची कमतरता भासणार नाही:- सुनील चव्हाण)
सोलापूर जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य सुनीलदादा चव्हाण यांच्या प्रयत्नातून मोहोळ तालुक्यातील येथील अंकोली ते औंढी रस्ते विकास कामासाठी २० लाख रुपयाच्या निधीचे वाटप करण्यात आले होते.
या निधीमधून ०७ मे रोजी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हा नियोजन समिती सदस्य सुनीलदादा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
यावेळी सुनील दादा चव्हाण म्हणाले की,अंकोली गावात सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तसेच २५/१५ योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन वर्षात ५० लाख रुपयांचा निधी विकास कामासाठी मंजुर केला असून भविष्यातही अंकोली गावच्या विकासासाठी शासन पातळीवरून भरघोस निधी मंजुर करुन गावचा विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच भैरवनाथ मंदिर परिसरात पेवर ब्लॉक साठी निधी प्रस्तावित केला असून पुढील दोन ते तीन महिन्यात निधी देण्याबद्दल कटीबद्ध आहोत अशी मत व्यक्त केले.
यावेळी मोहोळ तालुका सरचिटणीस माऊली भगरे, विशाल पवार, तालुका उपाध्यक्ष संजय वाघमोडे, जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, अंकोलीचे उपसरपंच अजिंक्य क्षीरसागर, अनिल पवार, प्रमोद जाधव,स्वप्निल डोंगरे, संजय पवार,सुनील पवार,धनंजय पवार, स्वरूपसिंह पवार, विजयसिंह पवार, पंडित घाडगे, मधुकर घाडगे, शशिकांत धुमाळ, हनुमंत साबळे, उपस्थित होते.