
सौ.अरुंधती धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त टाकळी सिकंदर येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न!
(१०१ रक्तदात्यांचे ऊस्फूर्त व विक्रमी रक्तदान)
(संग्रामदादा चव्हाण स्नेह परिवाराचा स्तुत्य उपक्रम)
सौ.अरुंधती(वहिनीसाहेब) महाडिक यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातो. मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे सौ.अरुंधती महाडिक यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले.या प्रसंगी १०१ रक्तदात्यांनी या शिबीरामध्ये रक्तदान केले. सदर भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन प्रा.संग्रामदादा चव्हाण, संघटक समन्वयक, भीमा परिवार तसेच सामाजिक कार्यकर्ता तथा माहिती अधिकार कार्यकर्ता श्री.अक्षय गायकवाड व त्यांचे सर्व सहकारी यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविला.
यावेळी प्रगतशील द्राक्ष बागायतदार श्री. शिवाजीराव गुंड- पाटील, मा. जि.प.सदस्य मानाजीबापू माने,सौंदणचे श्री.संभाजीराव माने,पुळूजचे माजी सरपंच महादेव शेंडगे,मा संचालक राजाभाऊ बाबर,संदीप देवकते, प्रमोद जाधव, सामाजिक कार्यकर्ते अक्षय गायकवाड,सिद्धेश्वर बापू अनुसे,व्हा. चेअरमन वि. का. सोसायटी,श्री पोपटराव सोनटक्के माजी श्री.गणेश अनुसे, प्रमोद जाधव, प्रा.माऊली जाधव इत्यादी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील आजवरचे हे शिबिर सर्वात मोठे रक्तदान शिबिर ठरले.
महाडिक कुटुंबीयांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी विक्रमी संख्येने रक्तदान केल्यामुळे भीमा परिवाराचे संघटक समन्वयक प्रा.संग्राम दादा चव्हाण यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.
मोहन वसेकर,सचिन वसेकर,तेजस डोंगरे,ऋषिकेश कोळी, किरण गायकवाड,
युवराज,अक्षय,बापू यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
चौकट
सध्या रक्तपेढींमधून रक्ताचा साठा कमी झाला असून अति तातडीच्या प्रसंगाच्या वेळी गरजू रुग्णांना, गर्भवती मातांना रक्त उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने सध्याच्या तीव्र उन्हाळ्यामध्ये 45 डिग्री सेल्सिअस तपमान असताना सुद्धा एक सामाजिक कर्तव्य म्हणून ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांची मी मनापासून ऋणी आहे. प्रा.संग्रामदादा चव्हाण स्नेह परिवाराच्या वतीने आयोजित केलेला रक्तदान शिबिराचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असाच आहे.सर्वांचे मी मनापासून आभार मानते.
सौ.अरुंधती धनंजय महाडिक
अध्यक्ष,भागीरथी महिला सामाजिक संस्था,कोल्हापूर