-
*शिंदेसेनेच्या नेत्या ज्योत्स्ना पाटील यांच्या हस्ते तनिष्क ज्वेलर्समध्ये गणरायाची आरती!
(स्टाफकडून उत्स्फूर्त स्वागत; विविध विषयांवर साधला आपुलकीचा संवाद)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
उद्योगिका तथा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नेत्या ज्योत्स्ना पाटील यांनी सोलापूर सात रस्ता येथील तानिष्क ज्वेलर्सला सदिच्छा भेट दिली. यावेळी तानिष्क ज्वेलर्सच्या विनंतीला मान देत त्यांच्या हस्ते गणरायाची मनोभावे आरती करण्यात आली.
ज्योत्स्ना पाटील यांचे शोरूममध्ये आगमन होताच स्टोअर मॅनेजर श्रेयश शिरसागर, फ्लोर मॅनेजर लखन भंडारी (RSO), श्रद्धा सुतार, उज्ज्वला नल्ला, रविता पवार, संगीता हिटनल्ली, गोविंद पुकळे, विजया, लक्ष्मी हुरले, सुहास उजळंबे, संदीप हत्तीराजू यांच्यासह अधिकारी व कर्मचारी वर्गाने उत्स्फूर्त स्वागत केले.
आरतीनंतर ज्योत्स्ना पाटील यांनी तानिष्क ज्वेलर्सच्या अधिकारी व कर्मचारी आपुलकीने संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली. त्यांच्या सदिच्छा भेटीमुळे शोरूममधील वातावरणात उत्साह निर्माण झाला. गणरायाच्या चरणी प्रार्थना करताना, “विघ्नहर्त्या गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, आरोग्य, आनंद आणि समृद्धी नांदो,” अशी मंगलकामना ज्योत्स्ना पाटील यांनी व्यक्त केली.
