*खासदार सुनेत्रावहिनी पवार व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोहोळ येथील “सावली” बंगल्यावर विविध कार्यक्रम!*
*(रक्तदान शिबीर बरोबरच व आधार कार्ड व शासकीय दाखला शिबिरांचे आयोजन)*
*(मोहोळ येथे विविध शासकीय दाखले, रक्तदान शिबिर व जनकल्याणकारी सेवा उपक्रम!)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत तसेच सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मोहोळ तालुक्यात विविध शासकीय दाखले व सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष *“शासकीय दाखला शिबिर”* आयोजित करण्यात आले आहे.
सदर शिबिर बुधवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत पार पडणार असून सावली बंगल्याच्या समोर, शासकीय गोदाम, यशवंत नगर, जुना ढोक बाबुळगाव रोड, मोहोळ येथे हे शिबिर होणार आहे.
हे शिबिर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमार गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या व खासदार सौ. सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने शिबिरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आले असून, नागरिकांना समाजसेवेच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिरात खालील शासकीय दाखले, योजना व सेवा नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतील:
• आधार कार्ड
• जात प्रमाणपत्र
• उत्पन्न दाखला
• नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र
• राशन कार्ड
• निवृत्तिवेतन योजना
• संजय गांधी निराधार योजना
• रोजगार नोंदणी
• जन्म दाखला
• मृत्यू दाखला
• मतदार ओळखपत्र
• आयुष्मान भारत आरोग्य कार्ड
• अपंगत्व प्रमाणपत्र
• घरपटी प्रमाणपत्र
• वृद्धापकाळ पेन्शन योजना
या शिबिरात “आपले सरकार सेवा केंद्र” मार्फत दाखले व अर्ज प्रक्रिया केली जाणार असून, शिबिरस्थळी संगणक, लॅपटॉप, प्रिंटर व आधार मशीन उपलब्ध राहतील. नागरिकांना तात्काळ प्रमाणपत्रे व दाखले दिले जातील.
तहसीलदार मोहोळ यांनी सांगितले की, “या शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा.”
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी खालील अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले आहेत —
1. श्री. सेतू मोहोळ
2. श्री. अमोल अरुण काळे
3. श्री. श्रीमंत गडदे
4. श्री. हिम्मत निंबाळकर
5. श्री. महंमद मुस्तफा हारून शेख
6. श्रीमती आरती रत्नदीप गायकवाड
सदर उपक्रमामध्ये नागरिकांना शासनाच्या सेवा, सामाजिक उत्तरदायित्व आणि रक्तदान या तिन्ही माध्यमांतून सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

