मंजूर कामांचा हिशोब द्या; २० मेची सभा तहकूब करा – विक्रम भैय्या शिरसट!
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पंढरपूर नगरपरिषदेची २० मे रोजी होणारी सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची मागणीc करण्यात आली आहे. याबाबत भाजपचे माजी शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पंढरपूर नगरपरिषदेच्या मागील सर्वसाधारण सभांमध्ये प्रोटोकॉलनुसार केवळ विषयांना मंजुरी देण्याचे काम होत असून, मंजूर विषयांवरील प्रत्यक्ष कामे होताना दिसत नाहीत. त्यामुळे जनतेची तसेच शासनाची दिशाभूल होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, येत्या २० मे २०२६ रोजी होणारी सर्वसाधारण सभा तहकूब करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच मागील सभांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या विषयांवरील कामांची सद्यस्थिती आणि त्याबाबत झालेल्या पाठपुराव्याची चौकशी करण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक नगरसेवक नाराज असल्याचा दावा विक्रम शिरसट यांनी केला आहे.
