
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन!
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-26 या गळीत हंगामाचा मिल रोलर पूजन कारखान्याचे मा.चेअरमन व संचालक मा.श्री.दिनकरराव मोरे यांचे शुभहस्ते व व्हा. चेअरमन मा.श्री.कैलास खुळे, मा.श्री.उमेशराव परिचारक व सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे गळीत हंगाम 2025-26 साठी सुमारे 11,500 हेक्टर क्षेत्राच्या ऊस नोंदी असून त्यामधून उपलब्ध होणाऱ्या संपुर्ण ऊसाचे वेळेत गाळप केले जाणार आहे. कारखान्यामार्फत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊस विकासाच्या विविध योजना मोठया प्रमाणात राबविण्यात येत असुन त्याद्वारेही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुधारित ऊस बेणेची लागवड करुन उत्पादनामध्ये वाढ करता आली आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेता यावे व त्यामध्येही आधुनिकरणाचा वापर व्हावा, यासाठी नुकतेच ए.आय.तंत्राज्ञान विकसीत झाले असुन त्याचाही ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त उपयोग व्हावा यासाठी कारखाना स्तरावरुन ए.आय.तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येत आहे. ए.आय.तंत्राज्ञान ही योजना कारखाना, शेतकरी व वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जाणार असुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा असे अवाहनही करण्यात आले.गळीत हंगाम 2025-26 साठी ऊस तोडणीसाठी आवश्यक असणारी ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा उभारली जात असुन करार प्रक्रिया सुरु आहे. त्याचप्रमाणे ऑफ सिझनमधील सर्व कामे करण्यात येत असुन ती लवकरच पुर्ण होतील.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन मा.श्री. कैलास खुळे संचालक श्री.दिनकरराव मोरे, श्री.उमेशराव परिचारक, श्री.दिलीपराव चव्हाण, श्री.ज्ञानदेव ढोबळे, श्री.बाळासाहेब यलमर, श्री.लक्ष्मण धनवडे श्री.भास्कर कसगावडे,श्री.भैरू वाघमारे, श्री.गंगाराम विभुते, श्री.सुदाम मोरे, श्री.विजय जाधव, श्री.किसन सरवदे, श्री.दाजी पाटील, श्री.दिलीप गुरव, श्री.शामराव साळुंखे आणि कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व अधिकारी उपस्थित होते.