हिंदू वैकुंठ स्मशानभूमीत पाण्याविना हाल; विक्रम शिरसटांचा प्रशासनावर हल्लाबोल!
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील गोपाळपूर रस्त्यावरील हिंदू धर्मीयांच्या वैकुंठ स्मशानभूमीत पाण्याअभावी अंतिम संस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत असल्याचे समोर आले आहे. स्मशानभूमी परिसरातील हॅन्डपंप (हापसा) बंद पडल्याने येथील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. त्यातच शेजारील चंद्रभागा नदीपात्रही सध्या कोरडे पडल्याने नागरिकांना साचलेल्या डबक्यातील दूषित पाण्याचा वापर करावा लागत आहे.
या डबक्यातील पाण्याला दुर्गंधी येत असून, अंतिम विधीसाठी आलेल्या कुटुंबियांना याच पाण्याचा वापर करावा लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एवढेच नव्हे तर मृतदेहाला शेवटचे पाणी पाजण्यासाठीही हेच अस्वच्छ पाणी वापरण्याची वेळ नागरिकांवर आली असल्याने भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.
ही गंभीर बाब भाजपचे माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसट यांनी निदर्शनास आणून दिली असून, त्यांनी पंढरपूर नगरपालिकेच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध केला आहे. स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी अंतिम विधीसाठी आलेल्या नागरिकांनीही प्रशासनाविरोधात हळहळ व्यक्त केली. स्मशानभूमीत तातडीने स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी विक्रम शिरसट यांनी केली असून, प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.; विक्रम शिरसटांचा प्रशासनावर हल्लाबोल!**सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
पंढरपूर शहरातील गोपाळपूर रस्त्यावरील हिंदू धर्मीयांच्या वैकुंठ स्मशानभूमीत पाण्याअभावी अंतिम संस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत असल्याचे समोर आले आहे. स्मशानभूमी परिसरातील हॅन्डपंप (हापसा) बंद पडल्याने येथील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. त्यातच शेजारील चंद्रभागा नदीपात्रही सध्या कोरडे पडल्याने नागरिकांना साचलेल्या डबक्यातील दूषित पाण्याचा वापर करावा लागत आहे.
या डबक्यातील पाण्याला दुर्गंधी येत असून, अंतिम विधीसाठी आलेल्या कुटुंबियांना याच पाण्याचा वापर करावा लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एवढेच नव्हे तर मृतदेहाला शेवटचे पाणी पाजण्यासाठीही हेच अस्वच्छ पाणी वापरण्याची वेळ नागरिकांवर आली असल्याने भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.
ही गंभीर बाब भाजपचे माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसट यांनी निदर्शनास आणून दिली असून, त्यांनी पंढरपूर नगरपालिकेच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध केला आहे. स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी अंतिम विधीसाठी आलेल्या नागरिकांनीही प्रशासनाविरोधात हळहळ व्यक्त केली. स्मशानभूमीत तातडीने स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी विक्रम शिरसट यांनी केली असून, प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.