
भारतीय जनता पार्टीच्या मोहोळ तालुका ग्रामीण अध्यक्षपदी रमेश माने यांची निवड!
(पेनुर गावचे माजी सरपंच व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे रमेश माने यांची निवड झाल्याबाबत सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव)
सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या मोहोळ तालुक्याच्या ग्रामीण दक्षिण मंडळ तालुकाध्यक्षपदी पेनुर गावचे माजी सरपंच रमेश माने यांची भाजपच्या वरिष्ठ स्तरावरून निवड झाली असून मोहोळ तालुका ग्रामीण दक्षिण मंडळ, यासाठी अनेक जण इच्छुक होते. पण भारतीय जनता पार्टीमध्ये केलेले काम व भाजपच्या वरिष्ठ स्तरावर नोंदवले गेलेले कार्य तसेच समाज कार्यामध्ये अग्रेसर असणारे रमेश माने यांची निवड झाल्याबाबत त्यांचे मोहोळ तालुका व संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
याबाबत नूतन मोहोळ तालुकाध्यक्ष ग्रामीण दक्षिण मंडळ रमेश माने यांनी सांगितले की, या पदाला योग्य न्याय देण्याची माझी भूमिका असून आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व योजना व भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वाचे काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या निवडी बाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा राष्ट्रीयअध्यक्ष जे.पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष, चंद्रशेखर बावनकुळे सोलापूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, वरिष्ठ भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजी पवार माजी तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण या सर्वांचा मी मन: पूर्वकआभारी आहे.
रमेश माने
नूतन तालुकाध्यक्ष दक्षिण मंडळ