
करमाळा अर्बन बँकेसाठी प्राध्यापक रामदास झोळ यांचे जवळजवळ पॅनल निश्चित!
(बँकेच्या सभासदांनी आमच्या पॅनेलला निवडून दिल्यास ठेवीदारांचे पैसे माघारी मिळणार:-प्रा. रामदास झोळ)
(३ अवैध झालेल्या अर्जाबाबत वरिष्ठ स्तरावर दाद मागणार:- प्रा रामदास झोळ)
करमाळा तालुक्यातील सर्व सभासदांची अर्थ वाहिनी म्हणून समजला जाणाऱ्या कर्मा अर्बन को-ऑपरेटिव बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीमध्ये दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, यांनी आपले पॅनल तयार केले असून जवळजवळ बारा जणांचे अर्ज यामध्ये वैध ठरले आहेत. यामध्ये तीन अर्ज अवैध ठरले असून याबाबत लवकरच आम्ही न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया सत्यकाम न्यूज नेटवर्कशी बोलताना प्रा. रामदास झोळ यांनी दिली.
यामध्ये प्राध्यापक रामदास झोळ सरांच्या पॅनल मधून सर्वसाधारण मतदारसंघातून मलिक पिंजारी चंद्रशेखर घोडेगावकर अनुरथ झोळ, निलेश श्रीवास्तव, राहुल शिंदे ब्रह्मदेव लोंढे, महिला राखीव प्रतिनिधी नंदिनी घोलप कौशल्या देवी जगताप, तर इतर मागासवर्गीय मतदार संघातून मलिक पिंजारी,दिलीप गानबोटे, अनुसूचित जाती जमाती सदाशिव वाघमारे, भटक्या विमुक्त जाती जमाती संदीप खटके हे अर्ज वैध आहेत.
तर केशरबाई चांदगुडे,अभयसिंह रोडगे,अर्जुन इंदूरे या तिनही अवैध उमेदवारी अर्जसाठी आम्ही न्यायालयात अपील केले असल्याचे प्रा रामदास झोळ यांनी सांगितले आहे.