
आषाढी वारीनिमित्त पंढरपूर शहरात महास्वच्छता अभियान संपन्न
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरमध्ये येणार आहेत. या पार्श्वभूमीवर, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून, ग्रामविकास मंत्रालय आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली ‘महास्वच्छता अभियान’ राबविण्यात आले. या अभियानात सक्रिय सहभाग घेत छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात स्वच्छता केली.
या उपक्रमातून शासनाच्या सामाजिक बांधिलकीची प्रकर्षाने जाणीव होत असून, आपले सरकार वारकऱ्यांच्या आरोग्य सुविधा सुनिश्चित करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. या अभियानामुळे पंढरपूर शहरात स्वच्छता राखली जाईल, लाखो वारकऱ्यांना स्वच्छ आणि कचरामुक्त परिसर अनुभवता येईल तसेच अस्वच्छतेमुळे होणाऱ्या रोगप्रसाराचा धोका लक्षणीय प्रमाणात कमी होईल.
यावेळी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, आ.समाधान आवताडे, देवेंद्र कोठे, मा.आ.प्रशांत परिचारक, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आयुक्त सचिन ओंबासे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.