
११वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा
(सदृढ आरोग्यासाठी दररोज योगा आवश्यक:रमेश माने)
पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला जागतिक योगा दिन ११वा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सकाळी ६:३० ते ८:०० या कालावधीमध्ये मोठ्या उत्साहाने मोहोळ भाजपा सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन योगा करीत ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
सदरयोग दिनांच्या कार्यक्रमास पेनुरमधील,नक्षत्र लॉन्सचे मालक समाधान माने , श्री अण्णासाहेब सलगर, भारत कोरे, ज्ञानेश्वर गायकवाड, दिनेश सुरवसे , भास्कर माने , प्रदिप कोरे , अनिकेत माने , अनिकेत सलगर, आदी सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.