शक्तीपीठ महामार्गाला बावी व सोलंकरवाडी येथील शेतकयांचा विरोध दिला आत्मदहनाचा इशारा!
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
शक्तीपीठ महामार्ग माढा तालुक्यातून जात आहे असे (व्हायरल नकाशा नुसार) कोणत्या गावातुन जाणार हे दिसत असून यामध्ये द्राक्षे पंढरी म्हणून ओळख निर्माण केलेल्या बावी गावातुन जात आहे शेजारील सोलंकरवाडी जात आहे या दोन्ही गावत मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत कोट्यावधींची उलाढाल होत असते या गावांमध्ये आधुनिक व प्रयोगशील शेती केली जाते पण व्हायरल नकाशा नुसार या गावामधुन शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे असे निदर्शनास आले या महामार्गाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे या गावांमध्ये माळरान व पडीक जमीन उपलब्ध असताना बागायती जमीनीतुन शक्तीपीठ महामार्ग नेण्याचा घाट कशासाठी बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असून महामार्ग गेल्यास भूमीहीन होणार आहेत महामार्गत बद्दल करून इतर माळरान जमीनीतुन शक्तीपीठ महामार्ग नेहणयात यावा अशा मागणीचे शेतकऱ्यांच्या सहयाचे निवेदन जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार माढा यांना दिले असून रस्ते विकास महामंडळ पुणे व पालकमंत्री साहेब यांना देण्यात येणार आहे

