ईश्वर वठार येथील सैनिक कुटुंबास गावातील लोकांकडून मारहाण!
(पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेण्यास झाला उशीर, पंढरपूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर सोलापूर महामार्गावरील ईश्वर वॉटर गावामध्ये हे धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून यामध्ये गावातीलच काही अज्ञात व्यक्तींनी जागेच्या कारणावरून गावातील नाभिक कुटुंब असणारे शिंदे कुटुंबाला मारहाण केली असून या संबंधित कुटुंबांमधील कुटुंबप्रमुख हे भारतीय लष्कर सेवेमध्ये जम्मू काश्मीर येथे देश सेवेसाठी रुजू असून ते स्वतः देश सेवा करत असताना त्यांच्या कुटुंबाला अशी मारहाण करण्यात आल्यामुळे संपूर्ण पंढरपूर तालुक्यांमध्ये खळबळ उडाली आहे…
याबाबतीत या कुटुंबातील प्रमुख व्यक्तींची पत्रकारांनी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की आम्ही दिनांक 18 एप्रिल रोजी आमच्या दैनंदिन कामांमध्ये रुजू असताना गावातील काही गावगुंडांनी आमच्या घराच्या समोर येऊन घरासमोरच मुरूम टाकण्याचा प्रयत्न केला.. त्याला आम्ही मज्जाव केला असता त्याच तील काही व्यक्तींनी व महिलांनी आम्हाला अमानुषपणे मारहाण केली. या अमानुष मारहाणी नंतर मी स्वतः पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यासाठी गेल्या असता तेथील अधिकाऱ्यांनी आमची लवकर तक्रार दाखल करून घेतली नाही.. व वेळ वाया घालवला त्यामध्ये मी स्वतः तक्रार दाखल करण्यासाठी गेलेलो असताना गावांमध्ये लवकर पोलीस गाडी आली नाही या सर्व घटनेचे CCTV फुटेज आमच्याजवळ असून सुद्धा पोलीस खात्याने गंभीर दखल न घेता आमच्या कुटुंबाला मारहाण केली यानंतर मी स्वतः पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना फोन द्वारे संपर्क केला असता ते त्या दिवशी पंढरपूर शहरांमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शहरातील मिरवणुका असल्यामुळे ते पोलीस अधिकारी त्यादिवशी व्यस्त होते… पण त्यांनी मला माघारी नंतर फोन करून काय झालेल्या घटनेची विचारपूस करून आम्ही योग्य रीतीने तपास करू असे आश्वासन दिले असे यावेळी मेजर शिंदे कुटुंबातील सुमित शिंदे यांनी सांगितले…
सदर घटना ही पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार या ठिकाणी घडले असून या घटनेचा पुढील सर्व तपास पंढरपूर तालुका पोलीस अधिकाऱ्यांकडून सुरू आहे..

