*आपला आणि शिक्षक असणारा माणूस आमदार करायचा आहे!*
*मानद सचिव सुधीर पटवर्धन*
*ज्ञानयात्री डॉ. बी. पी. रोंगे सरांनी साधला पंढरपूर तालुक्यातील शिक्षकांशी संवाद
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
‘शिक्षणावर, संस्थेवर प्रेम करणारा माणूस आपल्याला भेटला आहे. जिथे अडचण तिथे मदत करणे हा ज्ञानयात्री डॉ. बी. पी. रोंगे सरांचा मूळ स्वभाव आहे. त्यांच्याकडून आपण त्यांचे हात धरून काम करून घेऊ.’ असे मत पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सुधीर पटवर्धन यांनी व्यक्त केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) चे संस्थापक, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य तसेच स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. बी.पी. रोंगे हे पुणे विभाग शिक्षक मतदान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे व सोलापूर या पाचही जिल्ह्यांतील शिक्षकांशी मागील जवळपास दीड वर्षापासून संवाद साधत आहेत. या संवादाच्या माध्यमातून ते शिक्षकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे प्रश्न शासन स्तरावर मांडण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याच अनुषंगाने डॉ. रोंगे सर हे पंढरपूर शहर व तालुक्यातील शाळा महाविद्यालयातील शिक्षकांच्या भेटीच्या निमित्ताने संवाद साधत होते. या भेटींच्या निमित्ताने त्यांचे सर्वत्र जल्लोषाने स्वागत करण्यात येत होते. पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशालेला भेट दिल्यावर मानद सचिव सुधीर पटवर्धन हे सरांच्या नियोजनबद्ध अभ्यासावर प्रकाश टाकत होते. मानद सचिव पटवर्धन पुढे म्हणाले की, ‘डॉ. रोंगे सरांना दर महिन्याला शाळेत बोलावून प्रश्न मांडू, तो प्रश्न कधी सुटणार याचा त्यांच्या मार्गदर्शनाखाली तक्ता तयार करू. त्यातील किती प्रश्न सुटले? उर्वरित कधी? याचा ताळेबंध तयार करून प्रश्न कधी सुटणार याचे नियोजित पद्धतीने कार्य करून घेवू.अशा पद्धतीने आपण सरांसोबत काम करू. घरातला जवळचा माणूस म्हणून आपण त्यांना शिक्षक आमदार म्हणून विधानपरीषदेत पाठवू. यासाठी आपण डॉ.बी. पी. रोंगे सरांना शिक्षक आमदार करण्यासाठी रुक्मिणी पांडुरंगाचरणी प्रार्थना करू.’ असे सांगून पटवर्धन सरांनी डॉ. रोंगे सरांच्या कामाच्या पद्धतीची माहिती दिली. यावेळी पंढरपूर तालुक्यातील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, पंढरपूर, कवठेकर प्रशाला पंढरपूर, अरिहंत पब्लिक स्कूल पंढरपूर, दत्त विद्यामंदिर सुस्ते, एस.के.एन. सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज कोर्टी, न्यू सातारा शिक्षण संकुल कोर्टी, न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी, एसपी प्रोग्रेस पब्लिक स्कूल नांदोरे, ज्ञानदीप पब्लिक स्कूल नांदोरे, दौलतराव विद्यालय कासेगाव, विवेक वर्धिनी पंढरपूर, रेणुका विद्यालय बाभूळगाव, न्यू इंग्लिश स्कूल रोपळे, गगनगिरी विद्यालय सांगवी, किशोर निर्मळ पब्लिक स्कूल तारापूर, यशवंत विद्यालय पंढरपूर यांच्यासह इतर ११० पेक्षा जास्त शाळा, महाविद्यालयांना डॉ. बी.पी. रोंगे सरांनी भेटी देवून आपले विचार मांडले. वास्तविक पाहता शैक्षणिक क्षेत्रातील यशस्वी उपक्रम पाहता पंढरपूर तालुक्यातील शिक्षकांनी डॉ. रोंगे सरांना विजयी करण्याचा विडा उचलला असल्याचे जाणवते. यावेळी ‘शिस्त, नियोजन, परिश्रम व त्यातून मिळालेले यश’ म्हणजे डॉ. बी. पी. रोंगे सर होय. शिक्षकांसाठी तळमळ असणारा व्यक्ती आपणांस आमदार म्हणून विधान परिषदेवर पाठवायचा आहे. अशी भावना मुख्याध्यापक पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी शाळेतील शिक्षकांनी समस्या व अडचणी व्यक्त केल्या. ‘हे प्रश्न कसे सुटतील यासाठी मी कटिबद्ध आहे.’ अशी ग्वाही ज्ञानयात्री डॉ. बी. पी. रोंगे सरांनी शिक्षकांना दिली.
