*उद्योग खनिकर्म, मंत्रालयाकडून माळशिरस तालुक्यामध्ये तीन ठिकाणी एमआयडीसीसाठी मान्यता!*
*(या तीनही एमआयडीसी श्रीपुर-महाळुंग, शिवपुरी व माळशिरस महाराष्ट्र राज्य उद्योग विकास महामंडळाच्या जागेमध्ये स्थापन होणार!)*
*(पालकमंत्री जयकुमार गोरे,खासदार धैर्यशील मोहीते-पाटिल-माजी आमदार राम सातपुते व मा. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील,आमदार अभिजीत आबा पाटील व आमदार उत्तमराव जानकर पाठपुराव्यामुळे माळशिरस तालुक्यातील उद्योग व्यवसायाला येणार गती!)*
————————–
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील उद्योग व्यवसायाच्या, दृष्टिकोनातून महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या माळशिरस तालुक्यामध्ये श्रीपुर-महाळुंग, शिवपुरी व माळशिरस येथे महाराष्ट्र राज्य उद्योग मंत्रालयाकडून, या तीन ठिकाणी एमआयडीसीसाठी जागा निश्चिती करून या तिन्ही ठिकाणी एमआयडीसी उभा करण्यासाठी एक महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक प्रसिद्ध झाले असून, तीन एमआयडीसीमुळे माळशिरस तालुक्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील व पुणे जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय वाढला मोठी चालना मिळणार आहे! यासाठी माळशिरस तालुक्यातील तीन ठिकाणी निश्चित करण्यात आले असून श्रीपुर- महाळुंग, माळशिरस व शिवपुरी येथील ठिकाणी एमआयडीसी साठी जागा निश्चिती होऊन लवकरच याचे कामकाज सुरू होणार असल्याची माहिती यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे व शासन दरबारी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून या एमआयडीसी मंजूर करून या एमआयडीसीसाठी या भागातील सर्वच नेते मंडळींनी कसोशीने प्रयत्न केले असून यासाठी मा. खासदार रणजितसिंह नाईक, खासदार धैर्यशील मोहिते-पाटिल, निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार अभिजीत आबा पाटील, आमदार उत्तमराव जानकर, याचबरोबर अनेक या भागातील सर्वच नेते मंडळींनी ऑटोकाठ प्रयत्न केले असून या एमआयडीसीमुळे एकुणच, उद्योग व्यवसायाला चालना मिळणार असून यामुळे माळशिरस तालुक्यातील दळणवळण व आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे यावेळी या एमआयडीसीसाठी सातत्याने प्रयत्न करणारे ज्येष्ठ समाजसेवक शेतकरी नेते भानुदास सालगुडे-पाटिल यांनी सांगितले!
