*आमदार समाधान दादा आवताडे यांच्या जनसंपर्क कार्यालयातील सहकाऱ्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना दिला आपुलकीचा घास!*
*(कार्यालयीन सहकाऱ्यांच्या या अनोख्या शुभेच्छांमुळे आ आवताडे झाले जाम खुश)*
नेत्याच्या कोणत्याही संग-प्रसंग कामकाजात सावलीसारखा राबता ठेवणारे कार्यालयीन सहकारी म्हणजे त्या नेत्याचं सार्वजनिक जीवनातील खूप मोठे बलस्थान असते. नेता आणि कार्यालयीन सहकारी ही संकल्पना म्हणजे कोणत्याही सार्वजनिक कारभारव्यवस्थेचे प्रभावी अस्त्र मानले जाते. आपण नेत्याकडे सेवेला आहोत ही भावना जबाबदारीचा एक भाग असला तरी कर्तव्याच्या आणि जबाबदारीच्या पलीकडे जाऊन त्या नेत्याप्रती असणारे निर्भेळ प्रेम आणि जिवाभावाचा स्नेह पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांच्या एका विधायक कृतीने आमदार समाधान आवताडे हे पुरते धन्य आणि भावनाविवश झाले आहेत.
२१ नोव्हेंबर या दिवशी आमदार समाधान आवताडे यांचा सुवर्ण महोत्सवी अभिष्टचिंतन दिन संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थितीचे भान ठेवून विविध सामाजिक व सार्वजनिक त्याचबरोबर शैक्षणिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. पदाधिकारी, सहकारी, चाहते व कार्यकर्ते यांच्यामार्फत आमदार अवताडे यांना विविध मार्गाने शुभेच्छांचा वर्षाव होत असताना त्यांच्या मंगळवेढा येथील जनसंपर्क कार्यालयातून त्यांच्या सर्व स्वीय सहाय्यक व इतर कार्यालयीन कर्मचारी यांच्या संकल्पनेतून शुभेच्छा व्यक्त करण्याची एक प्रेरणादायी व अनुकरणीय आणि अनोखी अशी पद्धत समोर आली आहे. ती म्हणजे या सर्व सहकाऱ्यांनी आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा तालुक्यातील शासकीय म्हणजे ग्रामीण रुग्णालय व इतर सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये आरोग्याच्या निरनिराळ्या कारणास्तव उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना व त्यांच्यासोबत असणाऱ्या मंडळींना एक दिवसाचे भोजन देऊन विधायक शुभेच्छा उपक्रमाचा संपूर्ण राज्यामध्ये एक आदर्शवत पायंडा निर्माण केला आहे. सर्वस्वी सहाय्यक व इतर कर्मचारी सहकारी यांनी एकत्रित येऊन आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज प्रा. ली. नंदूर या साखर कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे त्याचबरोबर मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापती दिपाली ताड जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संबंधित नातेवाईकांना भोजनाचा डबा पोहच केला आहे.
एखाद्या कार्यालयातील सहकाऱ्यांनी आपल्या नेत्यांप्रती अशी शुभेच्छा संकल्पना राबवणे हे किंबहुना राज्यातील पहिलेच उदाहरण आहे. कार्तिकी एकादशीच्या मंगलदिनी आमदार समाधान आवताडे यांचा वाढदिवस योग साधून आल्याने या सर्व रुग्ण नातेवाईकांना या सहकाऱ्यांनी फराळाचे साहित्य वाटप करून सर्वशक्तीमान भगवंत विठुरायाला अभिप्रेत असणारी संवेदनशील माणुसकी आणि मानवतेचा धर्म जपण्याचे अनमोल कार्य यांच्या माध्यमातून साकार झाले असल्याची भावना या सर्व रुग्ण नातेवाईकांनी व्यक्त करून आमदार समाधान आवताडे यांना निरोगी व आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य साठी आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, डॉ नंदकुमार शिंदे, स्वीय सहाय्यक रावसाहेब फटे, स्वीय सहाय्यक प्रशांत घोंगडे, स्वीय सहाय्यक प्रकाश रोहिटे, स्वीय सहाय्यक नवनाथ शिंदे, स्वीय सहाय्यक अभिजित मोरे, संतोष कोळसे- पाटील, क्लर्क मोनू कोळी, सोशल मीडिया चीफ समन्वयक अजिंक्य केदार, व्हिडिओ क्रिएटर अजय सपताळे, फोटो एडीटर आदित्य लेंडवे, सुरेश सावंजी, बाळकृष्ण गुरव त्याचबरोबर संबंधित हॉस्पिटल मधील आरोग्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
