*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा पैलवान नितीनराव निळे यांचा केला सन्मान!*
*(मोहोळ तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार राजाभाऊ खरे यांची प्रमुख उपस्थिती)*
——————————-
मोहोळ तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने , माननीय आमदार राजाभाऊ खरे यांच्यातर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा पैलवान नितीन राव निळे व त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीने पंढरपूर येथे कार्तिक यात्रेचे एकादशी निमित्ताने आल्यानंतर यथोचित सन्मान केला!
यावेळी मोहोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री, एकनाथजी शिंदे यांनी सर्वांसमोर आमदार राजाभाऊ खरे यांना दिले! या सत्कार प्रसंगी, पैलवान नितीनराव निळे, सफरराज सय्यद, विकी देशमुख, याचबरोबर त्यांचे सर्व समर्थक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
