विधान परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी मालक समर्थकांनी लिहिले रक्ताने पत्र!
पवित्राच्या कमला एकादशी निमित्ताने चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जया भाऊ गोरे व प्रशांत मालकांच्या प्रतिमेस केला दुग्धाभिषेक!
(मालक समर्थकांनी मुख्यमंत्र्यांना घातली भावनिक साद)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यापासून रोज नवनवीन नावे या सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी समोर येत असतानाच सोलापूर जिल्ह्याचे नेते माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांचे नाव यासाठी पूर्णपणे मोठ्या प्रमाणात चर्चेत होते..
2021 ची पोटनिवडणूक व 2024 च्या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये माननीय प्रशांत मालकांनी स्वतःहून माघार घेऊन, मोठे मन दाखवून विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना संधी दिली होती आता प्रशांत मालकांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात यावी यासाठी सर्व स्तरातून भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळीवर निर्णय अवलंबून असून, यासाठी संपूर्ण पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व प्रशांत मालक समर्थक हे प्रयत्न करत असताना दिसत आहेत.. त्यासाठी युवा नेते प्रणव परिचारक सुद्धा, मुंबईमध्ये असून आज पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या वाळवंटामध्ये पवित्र अशा पुरुषोत्तम मासानिमित्ताने भरणाऱ्या कमला एकादशीचे निमित्त साधून, मालक समर्थकांनी श्री विठ्ठलाच्या व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार जी गोरे याचबरोबर जिल्ह्याचे नेते माननीय प्रशांत मालक परिचारक यांच्या प्रतिमेस, जलाअभिषेक व, दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व पालकमंत्री जयकुमार जी गोरे यांना सुद्धा आपल्या रक्ताने पत्र लिहून आपली भावना व्यक्त केली आहे.
यावेळी पंढरपूर शहर व तालुक्यातील प्रशांत मालक समर्थक म्हणून ज्यांची आवर्जून उल्लेख करावा असे विजयसिंह माने सर, श्री सतीशजी लेंगरे बबलू महाराज आसबे सचिन शिंदे श्री समाधान पाटील राजेंद्र कदम श्री अमोल पवार याचबरोबर पांडुरंग परिवारातील अनेक कार्यकर्ते या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
