(प्रशांत मालकांना उमेदवारी मिळाल्याबाबत सोशल मीडियावर चर्चा)
(प्रणव दादा परिचारक मुंबई येथे उमेदवारीसाठी ठाण मांडून बसल्याची सोशल मीडियातून मोठी चर्चा)
(२८ किंवा २९ मे रोजी सोलापूर जिल्हा बाबत मुख्यमंत्री निर्णय घेण्यात असल्याबाबतही माहिती)
सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची उमेदवारी माजी आमदार प्रशांत परिचारक यांना मिळावी यासाठी पुतण्या युवा नेते प्रणव परिचारक मुंबई येथे ठाण मांडून बसले आहेत. परिचारक यांना उमेदवारी निक्षित झाली असल्याचे सोशल मीडियावर संदेश फिरत आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने सोला पूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रम जाहीर होताच माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन चर्चा केली. यानंतर त्यानी पंढरपूरला पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेऊन कामाला लागा, असे आदेश दिले. परिचारक पंढरपुरात बैठक घेत असताना यूटोपियन कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक मुंबई येथे
ठाण मांडून बसले होते. यानंतर आता युवा नेते प्रणव परिचारक मुंबई येथे परिचारक यांना उमेदवारी मिळावी, यासाठी ठाण गांडून बसते असल्याचे
दिसून येत आहे.
माजी आमदार प्रशांत परिचारक यांना उमेदवारी देण्याचे आधारान मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन वर्षापूर्वी दिले होते. यामुळे त्याची पूर्तता झाली असून परिचारक यांना उमेदवारी मिळाली असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. यामुळे परिचारक गटांमध्ये उत्साह पसरला असल्याचे दिसून येत आहे. गेल्या
काही दिवसापासून माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदेच्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे.
विधान परिषदेसाठी १ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २ जून रोजी अर्जाची छाननी होणार असून ४ जून रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. यानंतर १८ जून रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
