(मोहोळच्या विकासासाठी २० कोटींच्या निधीची मागणी)
मुख्य रस्त्यासाठी १० कोटी; शहरातील दहा प्रभागांसाठी प्रत्येकी एक कोटींची मागणी)
(रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट!)
मोहोळ शहरातून रेल्वे स्टेशन रोड, पालखी मार्ग या प्रमुख रस्त्यासाठी १० कोटी व शहरातील दहा प्रभागांमध्ये विविध विकासकामे करण्यासाठी प्रत्येक प्रभागात एक कोटी असे १० कोटी असे एकूण २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मोहोळ शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मोहोळ शिवसेना पार्टी प्रमुख तथा शिवसेना ओबीसी महाराष्ट्र राज्य प्रमुख तथा प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
मोहोळ शिवसेना पार्टी प्रमुख तथा शिवसेना ओबीसी महाराष्ट्र राज्य प्रमुख रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने मुंबई येथील नंदनवन निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मोहोळ शहराच्या विविध विकासकामांबाबत निवेदन दिले. यामध्ये मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पालखी रोड, स्टेशन रस्ता या प्रमुख रस्त्याच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
शहरातील वाहतूक व्यवस्था, नागरिकांची वाढती वर्दळ आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रमुख रस्ता महत्त्वाचा असल्याने त्याच्या विकासासाठी निधी मिळावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
यासोबतच मोहोळ शहरातील दहा प्रभागांच्या विविध विकासकामांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपये, असा एकूण १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे प्रमुख रस्त्यासाठी १० कोटी आणि दहा प्रभागांसाठी १० कोटी, असा एकूण २० कोटी रुपयांचा निधी मोहोळ शहराच्या विकासासाठी मागण्यात आला आहे. शहरातील रस्ते, मूलभूत सुविधा तसेच प्रत्येक प्रभागातील आवश्यक विकासकामांना गती मिळावी, यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
*निधी उपलब्ध झाल्यास मोहोळ शहराच्या विकासाला गती मिळणार आहे*’
*मोहोळ शहरातील विकासकामांसाठी लवकरात लवकर निधीची पूर्तता करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. यामध्ये रस्त्याच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचेही ना. एकनाथ शिंदे यांनी आश्वस्त केले आहे*.
*मोहोळ शहरातील विकासकामांसाठी मागितलेल्या २० कोटी रुपयांच्या निधीबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असून, निधी उपलब्ध झाल्यास शहरातील विविध विकासकामांना गती मिळणार आहे*.
*रमेश बारसकर, शिवसेना नेते, प्रथम नगराध्यक्ष*
*शहरातील विविध विकासकामांना गती मिळावी, यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मोहोळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सिद्धी (ताई) वसे, शिवसेना मोहोळ शहरप्रमुख अतुल क्षीरसागर, नगरसेवक चंद्रकांत गोडसे, आबासाहेब वरकडे, सागर अष्टुळ, दौलतराव देशमुख, अजय कुडे, लखन कोळी, युवा नेते किशोर वसे, गणेश गावडे आणि योगेश गायकवाड उपस्थित होते*
