आज मा. खासदार मा.श्री.रणजितसिंहजी मोहिते-पाटील यांच्याकडून सांगोल्यातील कवी-साहित्यिकांचा गौरव!
(गांधी जयंतीनिमित्त साहित्यिकांशी साधला संवाद; मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा!)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून माजी खासदार व माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगोला तालुक्यातील कवी व साहित्यिकांची सदिच्छा भेट घेत त्यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव केला. समाजप्रबोधन, साहित्यनिर्मिती आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या साहित्यिकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा उपक्रम यावेळी राबविण्यात आला.
यावेळी कवी अॅड. महादेव कांबळे, प्रेमकुमार वाघमारे, शिवाजी बंडगर, ज्योतीराम फडतरे, फारुख काझी, सुनील जवंजाळ, सागर भजनावळे, ज्ञानेश्वर डोंगरे आणि कवी होवाळ यांचा सन्मान करण्यात आला.
साहित्य हे समाजाचा आरसा असून कवी व साहित्यिक आपल्या लेखणीतून समाजातील विविध प्रश्न, भावना आणि वास्तव प्रभावीपणे मांडत असतात. त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जागृत होण्यास मदत होते. अशा साहित्यिकांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या कार्याचा गौरव करणे ही समाजाची जबाबदारी आहे, या भावनेतून हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
या वेळी प्रा. विश्वनाथ आव्हाड, महेश नलवडे,चिटणीस दादाशेठ बाबर, अनिल जगदाळे, सुरेश पवार, सरपंच नामदेव पवार, धनश्री पवार, उद्धव पाटील, भीमाशंकर पैलवान सर, प्राचार्य हेमंतकुमार आदलिंगे, राहुल चव्हाण, माजी सरपंच महादेव पवार, माजी सरपंच विजय पवार, माजी सरपंच आळसुंदकर आणि अशोक पाटील गुरुजी, बाजार समिती संचालक धनाजी पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून सांगोला तालुक्यातील साहित्यिकांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. या भेटीमुळे साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांमध्ये सुसंवादाचे वातावरण निर्माण झाले.
