विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षा कडून उमेदवारी मिळावी यासाठी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, भीमाशंकर जमादार, किशोर पवार, प्रशांत साळे प्रा. संदीप साठे यांनी उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल करून उमेदवारी देण्याची मागणी केली.
(सोलापूर जिल्ह्यातील इच्छुकांच्या भाऊ गर्दीमुळे काँग्रेस कमिटीला आले यात्रेचे स्वरूप)
अक्कलकोट विधानसभा साठी :- माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे व माजी सभापती तथा सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष भीमाशंकर जमादार, २४७ मोहोळ विधानसभा साठी:- किशोर पवार,२४५ माढा विधानसभा साठी पश्चिम महाराष्ट्र किसान काँग्रेस काँग्रेसचे अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रा. संदीप साठे, तर २४७ – मोहोळ व २५४ माळशिरस (राखीव) या दोन विधानसभा साठी :- मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत साळे यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकित काँग्रेस पक्षाकडून रितसर उमेदवारी मिळावी यासाठी उमेदवारी मागणी अर्ज माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अँड.नंदकुमार पवार व सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे,यांच्या अध्यक्षतेखाली आज सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय (काँग्रेस भवन ) सोलापूर येथे सूपूर्त केला.
यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष अशपाक बळोरगी,प्रदेश सचिव पंडित सातपुते,तालुकाध्यक्ष शालिवाहन माने- देशमुख, सुलेमान तांबोळी, संजय पाटील,उपाध्यक्ष अशोक देवकते,विजय राठोड,सरचिटणीस प्रा. सिद्राम सलवदे, माजी तालुकाध्यक्ष सुरेश शिवपूजे, प्रदेशओबीसी विभागाचे उपाध्यक्ष सुधीर लांडे, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष सौदागर जाधव,उपाध्यक्ष राजकुमार पवार,सिद्धार्थ गायकवाड, मीडिया प्रमुख तिरुपती परकीपडला,प्रदेश सेवादलाचे सचिव अशोक कलशेट्टी, समीर कोळी, हनुमंत मोरे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा पाटील, पंचायत समिती सदस्य धणेश आचलारे, सचिन गुंड, सिद्राम पवार, विश्रांत गायकवाड,अशोक कस्तुरे, बिरा खरात, अंजलीताई वस्त्रे, अंजलीताई मोहिते,हनुमंत जावीर, मिजाज जहागीरदार,शंकर मोरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.