शेळवे येथे कृषी विषयक विविध शासकीय योजना व अँप्स बाबत जागरूकता कृषिदूत बालाजी गाजरे यांचा उपक्रम.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शेळवे येथे कृषी विषयक विविध शासकीय योजना व अँप्स बाबत जागरूकता कृषिदूत बालाजी गाजरे यांचा उपक्रम.

 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ ,राहुरी संचलित कृषी विद्यालय ,पुणे यांच्यावतीने ग्रामीण कृषी जागरूकता आणि ओद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम 2020 – 2021च्या अंतर्गत शेळवे, ता पंढरपूर येथे कृषिदूत गाजरे बालाजी आणि त्यांचे सहकारी यांच्या मार्फत शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .केंद्रप्रमुख डॉ.ए . व्ही .बुलबुले आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. डी .डी.सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शेतीविषयक विविध शासकीय योजना तसेच विविध कृषी अँप्स बद्दल शेतकऱ्यांना जागरूक करून त्याविषयी सखोल माहिती देण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेऊन लॉकडाऊन चे सर्व नियम पाळून सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला. प्रसंगी शेळवे गावातील शेतकरी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here