पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांचे संकल्पनेतील ऑपरेशन परिवर्तनच्या माध्यमातून मनपरिवर्तन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांचे संकल्पनेतील ऑपरेशन परिवर्तनच्या माध्यमातून मनपरिवर्तन

(हातभट्टी दारु काढणाऱ्यावर कारवाई सुरू)

(27 गावामध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी सर्व्हे सुरु :- सहा.पो. निरीक्षक निलेश तारु)

सोलापूर // प्रतिनिधी

करकंब पोलीस ठाणेकडुन ग्रामसुरक्षा योजना अंतर्गत 27 गावामध्ये सुरक्षाकरीता सायरन बसविण्यात आलेले आहेत. पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते व अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपुर विभाग विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली करकंब पोलीस ठाणेची हददीमध्ये अवैध धंदयावर कारवाई करणेबाबत निर्देष दिलेले होते.त्याप्रमाणे करकंब पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक निलेश तारु यांनी ग्रामसुरक्षा योजना अंतर्गत 27 गावामध्ये मंदीर/मस्जिद/ग्रामपंचायत/गावाचे मधोमध सायरन बसविण्याकरीता पोउपनि/अजित मोरे व बिट अंमलदार यांचे पथक तयार करुन पाठपुरावा करणेकरीता आदेश देण्यात आलेले होते.
करकंब पोलीस ठाणे कडील चार बिट मधील 27 गावामध्ये आपत्ती व्यवस्थापन व ग्राम सुरक्षा करीता मंदीर/मस्जिद/ग्रामपंचायत/गावाचे मधोमध सायरन बसविण्याकरीता आवाहन करण्यात आलेले होते. त्याप्रमाणे ग्रामपंचायत मधील संरपंच/उपसरपंच/पोलीस पाटील यांचे सहकार्याने पोहवा/02 रानगट ,पोहवा/247 हरीहर, पोहवा/398 गोडसे व पोहवा/424 घोळवे यांनी मिळुन सर्व गावांमध्ये सायरन बसविण्यात आलेले आहेत. सदरच्या सायरनचा उपयोग सर्व गावांमध्ये आपत्ती व्यवस्थान अंतर्गत गावातील लोकांना संकटकाळी सतर्क करण्याकरीत नदीला पुर/अतिवृष्टी/भुंकप/चोरी/दरोडा/वनप्राण्यांचा हल्ला/आग/साथीचे रोग इतर परीस्थितीची माहीती सायरन वाजवुन भोंग्याव्दारे देण्यात येणार आहे.सदरच्या सायरन भोंग्यामध्ये वरील परीस्थीतीवर तात्काळ नियंत्रण मिळविण्याकरीता पोलीस प्रशासन व ग्राम प्रशासन यांना माहीती मिळणार आहे. सदरच्या सायरन भोंग्यास मोठया गावातील सरपंच यांनी चांगला प्रतिसाद देत दोन ते तिन ठिकाणी सायरन भोंगे बसविण्यात आलेले आहेत.तसेच सपोनि/निलेश तारु यांनी सर्व गावामध्ये मुख्य चौक या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याकरीता आव्हाहन केलेले असुन त्याबाबत सर्वे सुरु आहे.
तसेच गणेशोत्सव काळामध्ये गणेश मंडळांना करमणुकीचे कार्यक्रम न करता त्याऐवजी कोरोनाचे अनुषंगाने आरोग्य विषयक शिबीरे/तपासणी/लसीचे डोस देणेबाबत गणेश मंडळांच्या अध्यक्षांना आवाहन करण्यात आलेले आहे.
तसेच करकंब पोलीस ठाणेकडील ऑपरेशन परीवर्तन अंतर्गत करकंब पोलीस ठाणे अंतर्गत हातभट्टी तयार करणारे बोचरे वस्ती, हराळे वस्ती, धाकटी वेस करकंब येथे छापा टाकुन हातभट्टी तयार करण्याकरीता तयार केलेले रसायन नष्ट करुन त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच हातभट्टी तयार करणारे आरोपींचे कुटुंबियांचे मनपरीवर्तन करुन त्यांना इतर व्यवसाय करण्याकरीता प्रबोधन करण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई करकंब पोलीस ठाणेचे प्रभारी सहा.पोलीस निरीक्षक निलेश तारु यांचे मार्गदर्शना खाली पोउपनि महेश मुंढे व पोउपनि अजित मोरे यांचे सुचनेप्रमाणे करकंब पोलीस ठाणेचे बिट अंमलदार यांनी केलेले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here