शासनाच्या बेजबाबदार पणामुळे एस सी. एसटी वर होणारे अन्याय अत्याचारात वाढ:सुनील ओहोळ बहुजन सत्यशोधक संघ.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील बोरगाव माळेगाव येथील मातंग समाजातील सरपंच दशरथ आनंता साठे यांचे मोठे बंधू धनाजी आनंता साठे यांचे निधन 20/ 8 /2021 रोजी झाले, गावातील समाजकंटक जातीवादी, मनुवादी लोकांनी अंत्यसंस्कार गावातील स्मशानभुमी मध्ये होऊ दिला नाही, ग्रामपंचायत समोरच अंत्यविधी करावा लागला अशी पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली,पीडित साठे कुटुंबांच सांत्वन करण्यासाठी सुनील आेहाेळ माळवाडी बोरगाव येथे आले होते त्यावेळेस ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये एसटी, एसटी वर होणारे अन्याय अत्याचारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून त्याला शासन, पोलीस प्रशासन जबाबदार आहे, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी 16 ऑगस्ट 1947 ला घोषणा दिली होती ये आझादी झुठी है देश कि जनता भुकी है. स्वातंत्र्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले नाही जोपर्यंत भारतीय संविधानाची 100% अंमलबजावणी केली जात नाही तोपर्यंत सर्वसामान्यांना न्याय मिळणार नाही, म्हणून बहुजन समाजातील सर्व युवकांनी एकत्र येऊन शासनाला संविधानाची अंमलबजावणी करायला लावणे हेच आपले स्वातंत्र्याची लढाई असेल असे ते म्हणाले,एखादा पीडित व्यक्ती पोलीस स्टेशनला न्याय मागन्यासाठी गेल्यानंतर त्याच्याच विरोधामध्ये 395 427 सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातात, म्हणून बहुजन समाजातील सर्व युवकांनी एकत्र येऊन फुले-शाहू-आंबेडकरांचे आंदोलन त्यांचे विचार व कार्य समाजापर्यंत पोहोचण गरजेचे आहे असे ते म्हणाले यावेळी बहुजन सत्यशोधक संघ सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब लोंढे, रिपब्लिकन मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटोळे, महेंद्र लंकेश्वर, माळशिरस तालुका अध्यक्ष मोहम्मद भाई, सतीश वाघमारे,जिल्हा कार्याध्यक्ष रामभाऊ कांबळे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here