पंढरपूर तालुक्यातील तब्बल १४३ प्रकरण लोकअदालतध्ये निकाली (तब्बल १४३ प्रकरणे तडजोडीनुसार निकाली) (०३ कोटी ९७ लाख रुपयांची वसुली)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर दिनांक ३० एप्रिल, रोजी जिल्हा न्यायालय, पंढरपूर येथे लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये तब्बल १४३ प्रकरणे तडजोडीअंती निकाली झाले व त्यामध्ये ३ कोटी ९७ लाख ८४ हजार ४१ रुपये वसुली करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश मा. श्री. एम. बी. लंबे यांनी दिली.प्रथम लोकअदातीचे उद्घाटन करणेत आले व लोकांमध्ये लोकअदालतीमध्ये लोकअदालतीचे असणारे महत्वाची माहिती देण्यात आली. सदर प्रसंगी पंढरपूर अधिवक्ता संघाचे उपाध्यक्ष श्री. एम. एम. नाईकनवरे व सचिव श्री. राहुल बोडके उपस्थित होते.

लोकअदालतीसाठी एकुण ४ पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामध्ये पॅनल क्रमांक १ मध्ये श्री. एम. बी. लंबे, जिल्हा न्यायाधीश-१, पंढरपूर, पॅनल क्रमांक २ मध्ये श्री. एस. एच. इनामदार, सह. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, पंढरपूर, पॅनल क्रमांक ३ मध्ये श्री. ए. आर. यादव, सह. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, पंढरपूर, पॅनल क्रमांक ४ मध्ये श्रीमती एस. ए. साळुंखे, ५ वे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, पंढरपूर वयांनी काम पाहिले.

सदर लोकअदालतीस विधीज्ञ, बॅंक कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी, महावितरणचे अधिकारी व पक्षकार मोठया संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here