विद्यार्थ्यांच्या सृजन रंगाला व कलागुणांना वाव देण्यासाठी दलित मित्र कदम गुरुजी सायन्स कॉलेज सज्ज:ॲड. सुजीत कदम सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव ९ ते १२ ऑक्टोबर रोजी पर्यंत

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विद्यार्थ्यांच्या सृजन रंगाला व कलागुणांना वाव देण्यासाठी दलित मित्र कदम गुरुजी सायन्स कॉलेज सज्ज:ॲड. सुजीत कदम

सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव ९ ते १२ ऑक्टोबर

मंगळवेढा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा अठरावा युवा महोत्सव दिनांक ९ ते १२ ऑक्टोबर २०२२ दरम्यान मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयात होणार असल्याची माहिती शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढाचे अध्यक्ष अॅड सुजीत कदम यांनी गुरुवार दिनांक ६.१०.२०२२ रोजी सकाळी ११:३० वाजता आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढाचे उपाध्यक्ष डॉ.सुभाष कदम संचालिका मीनाक्षी कदम,संचालिका तेजस्विनी कदम,सचिवा प्रियदर्शनी महाडिक,संचालक श्रीधर भोसले,राम नेहरवे,शिवाजी पाटील,यतीराज वाकळे तसेच मुख्याध्यापक रवी काशीद,कल्याण भोसले,जयराम आलदर ,अजित शिंदे,रमेश पवार,सुभाष बाबर आदीजण उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडून युवा महोत्सवाच्या यजमान पदासाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यानुसार शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा संचलित दलित मित्र कदम गुरुजी सायन्स कॉलेजकडून युवा महोत्सव घेण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार आमच्या महाविद्यालयास कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली एक कमीटी येऊन भेट दिली व यंदाच्या महोत्सवाची जबाबदारी आमच्याच्याकडे सोपवली आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाढ मिळावा यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. यंदाचा युवा महोत्सव आमच्या दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालयात संपन्न होणार आहे.यासाठी महोत्सव काळात विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी आमचे महाविद्यालय तत्पर असेल.

गेली दोन वर्ष कोरोनामुळे विद्यापीठाचा युवा महोत्सव झाला नाही. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाढ मिळावा यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. यंदाचा युवा महोत्सव आमच्या दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालयात संपन्न होणार आहे.यासाठी महोत्सव काळात विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी आमचे महाविद्यालय तत्पर असेल असे अॅड सुजीत कदम म्हणाले.

चौकट
या वर्षासाठी युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी कलाकारांची वयोमर्यादा २५ वर्षा वरून २७ करण्यात आली आहे. त्याचबरोबर दोन संघ व्यवस्थापक, तीन व्यावसायिक साथीदार आणि विद्यार्थी मिळून एकूण ४९ जणांच्या संघाची प्रवेश शिका यंदा स्वीकारली जाणार आहे.त्याचबरोबर यंदाच्या वर्षापासून युवा महोत्सवात कथाकथन आणि काव्यवाचन या कलाप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे .त्यानुसार आता युवा महोत्सवात एकूण २९ त्याला प्रकारांची सादरीकरण पहावयास मिळणार आहे.

चौकट:-
दलित मित्र कदम गुरुजी सायन्स कॉलेजमध्ये होणाऱ्या युवा महोत्सव साठी येणाऱ्या सर्व कलाकारांच्या चार दिवस नाष्ठा व जेवणाची सोय केली आहे. तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था तसेच विद्यार्थी कॉलेजमध्ये नेण्या आणण्यासाठी विशेष गाड्यांची सोय. शंभर मोबाईल टॉयलेटची सोय. २९ कला प्रकारांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मंचाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्राथमिक उपचार सुविधा, अॅम्ब्युलन्स अशा प्रकारे विविध ५६ कमिट्यांची स्थापना करून विद्यार्थ्यांना चांगली सुविधा देण्यात येणार आहे. प्रवेशिका असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here