स्वाभिमानी करणार सहकार शिरोमणी कारखान्यावर ही हलगी नाद आंदोलन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

स्वाभिमानी करणार सहकार शिरोमणी कारखान्यावर ही हलगी नाद आंदोलन

(सिताराम कारखान्यासाठी घेतलेले शेतकऱ्यांचे शेअर्सचे पैसे माघारी द्या अन्यथा धुराडे पेटू देणार नाही)

सोलापूर // प्रतिनिधी

सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्यास मागील वर्षी गाळपास आलेल्या ऊसाची FRP व कामगारांचे पगार थकले आहेत कोरोना लाॅकडाऊनमुळे शेतकरी कामगार आर्थिक अडचणीत असताना कारखाना बिल देत नाही त्यामुळे शेतकरी हावालदिल झाला आहे,
तसेच कल्याणराव काळे यांच्या खाजगी मालकीच्या उसळलेला सिताराम शुगर हा कारखाना उभा करत असताना मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांनकडुन शेअर्स रक्कम(सुमारे 28 कोटी) गोळा केली होती पण शेतकऱ्यांचे शेअर्स चै पैसे न देता कारखाना विकुन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.
वरील मागण्याचा गांभीर्याने विचार करुण शेतकरी कामगार यांना लवकरात लवकर थकीत ऊस बिले पगार मिळावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल या मागणीचे निवेदन आज पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले साहेब यांना देण्यात आले
त्यावेळी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, नामदेव कोरके, संतोष बागल, नानासाहेब चव्हाण, सचिन आटकळे,बाहुबली सावळे, इत्यादी सह शेतकरी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here