खोटा अट्रोसिटी चा गुन्हा व ठार मारण्याची धमकी अजिंक्यराणा पाटलासह तिघांवर गुन्हा दाखल

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मोहोळ तालुक्यातील अनगर येथील शिवजयंती च्या मिरवणूकीत नाचल्याच्या कारणावरून जयवंत महादेव थिटे- पाटील रा. अनगर यांचेवर खोटा अट्रोसिटी चा गुन्हा दाखल करून जीवे ठार मारण्याची धमकी दि. २६ रोजी दिले प्रकरणी अजिंक्यराणा व्यंकटेश राजन पाटील, महादेव जगन्नाथ गुंड मेहबूब बागवान व अक्षय देविदास भडकवाड सर्व रा. अनगर ता. मोहोळ यांचेवर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

माहितीनुसार श्रीमती उज्वला महादेव थिटे-पाटील रा. अनगर यांचा मुलगा जयवंत थिटे-पाटील हा शिवजयंती च्या मिरवणुकीत नाचाला होता. या कारणावरून त्यांचेवर खोटा अट्रोसिटी चा गुन्हा दाखल करून उज्वला थिटे व जयवंत थिटे या दोघांना अजिंक्य राणा व्यंकटेश राजन पाटील यांच्या सांगण्यावरून महादेव जगन्नाथ गुंड, मेहबूब बागवान व अक्षय देविदास भडकवाड या तिघांनी शिविगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली . असे उज्वला थिटे- पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास याबाबत मोहोळ पोलीस करीत आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here