श्री.दिगंबर मुनिनाथ भजनी मंडळाच्या वतीने गुरू पौर्णिमा साद्या व घरगुती पध्दतीने साजरी.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री.दिगंबर मुनिनाथ भजनी मंडळाच्या वतीने गुरू पौर्णिमा साद्या व घरगुती पध्दतीने साजरी.

 

श्री . दिगंबर मुनिनाथ भजनी मंडळाच्या वतीने गुरू पोर्णिमा निमित्त गुरू पुजा अत्यंत साद्या व घरगुती पद्धतीने साजरा करण्यात आले . अशी माहिती मंडळाचे संस्थापक विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी दिली आहे .
पुर्व विभागातील श्री . दिगंबर मुनिनाथ भजनी मंडळाच्या वतीने गुरू पोर्णिमा विविध धार्मिक कार्यक्रमाद्वारे अत्यंत साद्या व घरगुती पद्धतीने साजरा करण्यात आली . सकाळी ८ वाजता गुरू फताका फडकाविण्यात आला . सकाळी ९ ते ११ होम हवन आणि सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत भजनाचे कार्यक्रम साजरा करण्यात आला . यात श्री . कल्याणम् व्यंकटदास भजनी मंडळ , श्री . दिगंबर मुनिनाथ भजनी मंडळ , श्री . भावनाऋषी भजनी मंडळ व इतर भजनी मंडळाने तेलगु , मराठी , कन्नडा , हिंदी भजनगीत सादर केले . आणि दु . १ ते २ वाजेपर्यंत प्रसाद वाटप व दुपारी ३ वाजता गुलालाच्या कार्यक्रमाने गुरू पोर्णिमा पुजेचा समारोप करण्यात आला .
शुक्रवारी विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या निवासस्थानी झालेल्या गुरु पुजेत श्रीनिवास चिलवेरी , वासु यलदंडी , नागेश कन्ना , बालाजी कोटा , जोगु पंतुलु , बालाजी भंडारी , अनिल श्रीचिप्पा , श्रीनिवास कुसुरकर (महाराज) , बोडा (महाराज) , नागनाथ कारमपुरी , चंद्रकांत लिंबोळे यांच्यासह गुरु भक्त बुंधु – भगिनी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here