जागतिक महिला दिनानिमित्त जेष्ठ महिलांचा सन्मान

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर -समर्थ जेष्ठ नागरिक संघाचे वतीने शेळगी येथील विरंगुळा केंद्रात महिला दिनाच्या औचीत्याने सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या हस्ते व मान्यवरांचा उपस्थितीत वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या महिलांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगूबाई निन्ने होत्या.
प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष बाबूराव नरुणे यांनी प्रास्ताविक केले. तदनंतर संजय जोगीपेटकर यांनी आपल्या व्याख्यानात महिला दिनाचे महत्त्व, महिलांचे स्थान आणि अधिकार यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमास महिला व पुरुषांची संख्या लक्षणीय स्वरूपाची होती.
आपल्या मनोगतात प्रांजली सोनवणे म्हणाल्या, “मी स्वत: एक महिला असलेने मला महिलांच्या मुळ समस्या ठाऊक आहेत. मुलगी,आई, गृहिणी इ. अनेकविध भूमिका वाठवताना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते. बऱ्याचदा पोलिसांची मदत सुद्धा हवी असते. अशा वेळी केवळ हाक द्या आम्ही तुमच्या मदतीला धाऊन येऊ”
त्यांच्या या आवाहनाला उत्स्फूर्त दाद मिळाली.

यावेळी उपस्थित इतर महिला भगिनिंना देखील गुलाब पुष्प देवून शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रम यशस्वी करणेसाठी मन्मथ कोनापुरे, अशोक खानापुरे, चंद्रकांत बिराजदार, शिवलिंगप्पा शहाबादे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here