श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे कामगार करणार आंदोलन.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे कामगार करणार आंदोलन.

(रणजितसिंह मोहिते पाटलांवर ठेवला विश्वासघाताचा ठपका)

सोलापूर // प्रतिनिधी

श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर तालुका माळशिरस या साखर कारखान्याचे कामगार कारखाना प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याचे कामगारांच्या मधून बोलले जात आहे कारखान्याचे विद्यमान चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कामगारांचा विश्वास घात केल्याचा घणाघाती कामगारांनी आरोप केलेला आहे.
श्री शंकर सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीमुळे बंद अवस्थेत होता. सदरच्या कारखान्यावर प्रशासक नेमलेली होते कारखाना खाजगी मालकाकडे जाऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या आजी-माजी संचालक ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी न्यायालय लढाई लढून सदर चा कारखाना सहकारी कायम करून सदर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली होती त्यावेळेस विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात पॅनल उभा केलेले होते त्यावेळेस सभासद व कामगार यांना विश्वासात घेऊन सदरची निवडणूक जिंकलेली होती. कारखाना सुरू करताना सर्व कामगारांना पहिल्यांदा प्राधान्याने कामावर घेतली जाईल असे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आश्वासन दिले होते त्यामुळे सर्व कामगारांनी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवलेला होता. सन 20 21 -2022, गळीत हंगाम सुरू करण्याच्या हालचालीसुरू झालेल्या आहे उसाच्या नोंदी घेऊन ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे करार केलेले आहेत कारखान्यांमध्ये नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून मुलाखतीची तारीख जाहीर केलेली आहे नोकर भरतीची तारीख जाहीर झाल्यानंतर पूर्वीचे कायम व हंगामी कामगार यांना काही दिवसा करता लिव ब्रेक दिलेले कामगार अस्वस्थ झालेली आहे. कारखाना बंद अवस्थेत असताना इतरत्र कारखान्याकडे तात्पुरतं नोकरीसअसणारे कामगार श्री शंकर सहकारी साखर कारखाना सुरू होण्याकडे लक्ष लागलेले होते कारखाना सुरू झाल्यानंतर आपण आपल्या कारखान्यातील अनेक वर्षे नोकरी केलेल्या या जागेवर काम करता येईल असे वाटत असताना नव्याने नोकर भरती कारखान्याचे चेअरमन ,व्हाईस चेअरमन, प्रभारी मॅनेजिंग डायरेक्टर यांनी सुरू केलेली असल्याने मूळ कामगार आक्रमक झालेले आहे.आमचे कारखान्याकडील थकित वेतन असताना आमचा हक्क कामावर असतानासुद्धा नव्याने भरती करणे खपवून घेतले जाणार नाही. कारखाना स्थळावर आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याचे कामगारांच्या मधून बोलले जात आहे. कारखान्याचे विद्यमान चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कारखान्याच्या जुन्या कामगारांचा विश्वास घात केला असल्याचा आरोप केलेला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here