काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांची “भारत जोडो” पद याञा ; दिल्लीच्या पथकाने मंगळवारी शंकरनगर येथे केली पाहणी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

: काँग्रेस नेते राहून गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा पुढील महिन्यात नांदेड जिल्ह्यात येत असून. दुसरा मुक्काम शंकरनगर येथे होणार आहे. त्यामुळे येथे मिनलताई खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी करण्यात येत असून. मुक्कामाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी दिलीचे एक पथक मंगळवारी शंकरनगर येथे आले होते.
‘मिले कदम, जुडे वतन’ ही भारत जोडो यात्रेची टॅगलाईनसह काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा पुढील महिन्यात पाच ते सात नोव्हेंबर दरम्यान नांदेड जिल्ह्यात पोहोचणार असुन ही पदयात्रा देगलूर पासून नांदेड कडे जात असताना शंकरनगर येथे राहुल गांधी यांचा दुसरा मुक्काम राहणार आहे. त्यांच्या स्वागताची आणि मुक्कामाची शंकरनगर येथे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण व माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर आणि डॉ.सौ. मीनल पाटील खतगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयत तयारी सुरू आहे.
नांदेड जिल्ह्यात राहुल गांधी यांची पदयात्रा देगलूर पासून नांदेडकडे रवाना होणार असल्याने त्यांच्या पदयात्रेचा शंकरनगर तालुका बिलोली येथे मुक्काम होणार आहे. त्यांच्या भव्य स्वागत करण्यासाठी व त्यांच्या मुक्कामासाठी शंकरनगर येथील गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याच्या मैदानाची निवड करण्यात आल्याने येथे मैदानावर दोन जेसीबीच्या साह्याने ग्राउंड बनवण्याचे काम सुरू आहे. होत असलेल्या तयारीची पाहणी करण्यासाठी (ता.११) ऑक्टोंबर रोजी दिल्ली येथील राहुल गांधी यांच्या विश्वासू पथकाने शंकरनगर येथील मैदानाची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांचे येथील मैदानावर स्वागत करण्यात आले.
यावेळी आ.अमर राजूरकर, माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर , काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ.सौ. मीनल पाटील खतगावकर, माजी शिक्षण सभापती संजय अप्पा बेळगे, शिवाजी पा. पाचपिपळीकर, बाळासाहेब पाटील खतगावकर, अपर्णा नार्लेकर, अनिता इंगोले, माधव वाघमारे, माधवराव कंधारे, प्राचार्य बालाजी पिंपळे, प्राचार्य दुर्गाप्रसाद पांडे , आनंदराव बिराजदार, सदाशिव पाटील डाकोरे आधी सह अनेक मान्यवर व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

राहूल गांधींच्या पदयात्रेचा दुसरा मुक्काम शंकरनगर येथे असल्याने तयारी करण्यात येत असून. या यात्रेदरम्यान दिपावली येत असल्याने त्यांची पदयात्रा एक दोन दिवस मागेपुढे होण्याची शक्यता असली तरी (ता.२०) नंतर यात्रा नांदेड जिल्ह्यात कधी प्रवेश करणार आहे हे निश्चित होईल.

डॉ. मिनल पाटील खतगावकर.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here