*विठुरायाचा आशीर्वाद पाठीशी; रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला पंढरपूर संस्थानच्या विश्वस्तांची भेट!*
*(हभप जळगावकर महाराजांनी घेतली आमदार रोहित दादा पवार यांची आंदोलन स्थळी भेट)*
*(पंढरपुरात सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यभरातून शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
पंढरपूरच्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिर संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. जळगावकर महाराज यांनी सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनाला नैतिक पाठिंबा दर्शविला.
या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार म्हणाले, “विठ्ठल- रुक्मिणी संस्थानच्या विश्वस्तांनी आंदोलनस्थळी दिलेली भेट ही आमच्यासाठी विठुरायाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्याचंच द्योतक आहे.”
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून आंदोलनाला विविध आमदारांसह सर्वसामान्य नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आंदोलनस्थळी राज्यभरातून पाठिंबा व्यक्त केला जात असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
