माढ्यात यंदा नक्कीच बदल होणार?
(माढा मतदारसंघात शरद चंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडून अभिजीत पाटील यांच्या हाती “तुतारी”)
संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये गाजत असलेल्या माढा विधानसभा मतदारसंघात नवा ट्विष्ठ समोर आला असून या मतदारसंघातून अनेक इच्छुकांपैकी पंढरपूरचे असणारे व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांचे नाव महाविकास आघाडीच्या यादीत फायनल झाले असून या यादीमध्ये महाविकास आघाडी पक्षांमध्ये समाविष्ट असलेल्या शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अभिजीत धनंजय पाटील यांचे नाव जवळजवळ निश्चित झाल्याची माहिती काही मुंबईतील वृत्त संस्थांनी प्रसिद्ध केले असून या बातमीलाही काही अभिजीत आबा पाटील समर्थक व कार्यकर्त्यांनीही दुजोरा दिला आहे अभिजीत आबा पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असून त्यांनी मागील सहा महिन्यापासून माढा विधानसभा मतदारसंघात तयारी सुरू केल्याचे दिसून येते जर अभिजीत आबा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली तर पंढरपूर तालुक्याला दोन आमदार मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.