*शक्तिपीठ महामार्गाची चोरी…. मुख्यमंत्र्यांची दिशाभूल!* *पंढरपूरकर नाराज! सहा आमदारांची प्रतिष्ठा पणाला!*
*प्रा. संग्राम दादा चव्हाण*.
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
उत्तर सोलापूर मोहोळ पंढरपूर आणि सांगोला आटपाडी या पाचही तालुक्यांमधून शक्तिपीठ महामार्गासाठी भूमि अभिलेख कार्यालय,कृषी विभाग,जल प्राधिकरण, महसूल विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग या पाचही विभागांची शक्तिपीठ बाधित शेतजमिनींच्या संयुक्त मोजणी चे काम 99% पूर्ण झाले असल्याचा कार्यालयीन अहवाल एकीकडे सादर होत असताना दुसरीकडे वरील पाच तालुक्यातील शेतकऱ्यांचा शक्तिपीठ महामार्गाला विरोध असल्याचा खोटा आभास पसरवून व पाच तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची दिशाभूल करून शक्तीपीठ महामार्ग आपापल्या मतदारसंघांमध्ये पळवून नेण्याचे करण्याचे कुटिल षडयंत्र आज जिल्ह्यामध्ये उघड झाले. या पाच तालुक्यामधून शक्तिपीठ महामार्गाची चोरी करण्यासाठी जून महिन्यापासून गुप्त पत्र व्यवहार व गुप्त बैठका चालू असल्याचे आज जिल्ह्यामध्ये उघड झाले. शक्तिपीठ महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या शेतजमिनींना मिळणारा मोबदला अत्यंत तुटपुंजा म्हणजे जिराईत भागामध्ये तो प्रती एकर जास्तीत जास्त फक्त नऊ ते दहा लाख रुपये एवढाच गृहीत धरला जातो ही वस्तुस्थिती शेतकऱ्यांना समजल्यानंतर मोबदला वाढवून मिळण्यासाठी काही शेतकऱ्यांनी सुरुवातीला विरोध नोंदविला होता. परंतु राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी त्या त्या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी या महत्वकांक्षी प्रकल्पाला सहकार्य करावे असे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या परिसरातून द्रुतगती महामार्ग गेल्यास अनेक अनुषंगिक फायदे होतील व परिसराचा उत्तुंग विकास होईल या आशेने आपापल्या आमदारांच्या विनंतीला मान देत सर्व बाधित शेतकऱ्यांनी शंभर टक्के विरोध संपवून संयुक्त मोजणीला सकारात्मकपणे संपूर्ण सहकार्य केले व सदर माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या प्रकल्पाला आपल्या जमिनी द्यायचे ठरवले. आज उत्तर सोलापूर पासून ते आटपाडी या पाचही तालुक्यांमध्ये संयुक्त मोजणी व मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे. या कामांसाठी मोनार्क या खाजगी कंपनीला हजारो कोटींचे कंत्राटही देण्यात आले होते तसेच सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी जीवाचं रान करत सदर संयुक्त मोजणी व मूल्यांकनाचे काम पूर्ण केले आहे. स्थावर व जंगम मालमत्तेचे मोजणी व मूल्यांकनही झाले असून पत्र्याचे बिल्ले मारून नंबरिंग करण्यात आले आहे. शक्तिपीठ महामार्गासाठीचे प्रथम प्रकटीकरण हे तीन वर्षांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आले. गत विधानसभेच्या अगोदर काही दिवस शक्तिपीठ महामार्ग रद्द केल्याचा आदेश पारित करण्यात आला होता. शेतकरी महामार्ग होणार की नाही या संभ्रमात सापडले होते. त्यामुळे त्यांच्या बाधित शेत जमिनींमध्ये त्यांना पिके घेता आली नाहीत. तसेच बाधित क्षेत्रावरील फळबागांचे बहार धरण्याच्या दृष्टिकोनातून संगोपन करावे की नाही याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली.परिणामी गेल्या तीन वर्षांमध्ये 27 हजार एकरावरील शेतकऱ्यांचे हजारो कोटींचे आर्थिक नुकसान झाले. सदर बाधित शेतजमीन गट नंबर चे महसूली व्यवहार गेली तीन वर्षे झाले थांबविले असल्यामुळे सदर शेत जमिनींवर शेतकऱ्यांना गहाण खत करून कर्जे घेता आली नाहीत तसेच जमिनीचे खरेदी विक्री व्यवहारांवर बंदी घालण्यात आली असल्याने खरेदी विक्री करता आली नाही. डीपीआर प्लॅन, नोटिफिकेशन, ड्रोन सर्वे, शासनाच्या पाच विभागांकडून जमिनीची मोजणी तसेच जमिनीवरील झाडे,विहिरी,बोरवेल्स पाईपलाईन्स, घरे,गुरांचे गोठे पत्रा शेड्स,ठिबक सिंचन,शेततळी व पीक पंचनामे यावर शासनाचे हजारो कोटी रुपये खर्च झाल्याचे समजते. शासनाच्या आर्थिक नुकसानाला व सरकारी अधिकाऱ्यांचे श्रम वाया जाणार याला कोण जबाबदार असा खडा सवाल विचारला जात असून सदरचा शक्तीपीठ महामार्ग इतर मतदारसंघात पळवून नेण्याच्या कृतीमुळे वरील पाच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तसेच जनतेच्या मनामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून सर्व लोकांनी एकजुटीने तीव्र आंदोलन छेडण्याच्या पवित्रा घेतला आहे. मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आपापल्या लोकप्रतिनिधी-आमदारांना धारेवर धरल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. या पाच तालुक्यांमधून शक्तिपीठ महामार्गाचे स्थलांतर झाले तर जनतेने सामूहिक आमरण उपोषणाचा इशारा तर काही बाधित शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा दिला आहे. शक्तिपीठ महामार्गाचे जुने आरेखन बदलून नवीन आरेखना नुसार जर महामार्ग इतर तालुक्यांमध्ये स्थलांतरित होण्यापासून रोखता आला नाही तर पाचही मतदारसंघांच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून त्याला शक्तिपीठ महामार्ग वाचवू शकले नाहीत तर जनतेच्या रोशाला सामोरे जावे लागेल. जुन्या आरेखनानुसार शक्तिपीठ महामार्गाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये शून्य विरोध असून महामार्ग जुन्या आलेखनाप्रमाणेच पूर्णत्वास न्यावा व भागाच्या विकासाला चालना द्यावी असे आवाहन प्रा. संग्राम दादा चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले.
चौकट
*आमदार अभिजीत पाटील आणि बबनराव शिंदे यांनी शक्तिपीठ पळवून नेण्याचा हट्ट सोडावा*
*माढा मतदार संघाचे आमदार अभिजीत आबा पाटील यांच्याकडे आम्ही उदयोन्मुख जिल्ह्याचे*
*नेतृत्व म्हणून पाहतो. त्यांच्याकडून जिल्ह्यातील जनतेच्या मोठ्या अपेक्षा व आशा आहेत.मात्र शक्तिपीठ महामार्ग माढा मतदारसंघात पळवून नेण्याचा संकुचित हट्ट त्यांनी सोडून द्यावा. जुन्या आरेखनानुसार पाच तालुक्यांमध्ये शक्तिपीठ महामार्गाचे संयुक्त मोजणी व मूल्यांकनाचे 99% काम पूर्ण झाले असताना शासनाचे हजारो कोटी रुपये खर्च झाले असताना बाधित शेतकऱ्यांच्या गेली* *तीन-चार वर्षे झाले जमिनी पडीक राहून त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असताना त्यांनी शक्तिपीठ महामार्ग आपल्या मतदारसंघात पळवून नेण्याचा माननीय मुख्यमंत्री यांचेकडे पाठपुरावा करणे हे आमच्यासाठी तसेच सर्वच पंढरपूरकरांसाठी* *वेदनादायक आहे. पंढरपूर या विठुरायाच्या नगरी जवळून जाणारा शक्तिपीठ महामार्ग हा त्यांच्या मागणी प्रमाणे नव्या आरेखनानुसार हा मोडनिंब परिसरातून म्हणजे पंढरपुरापासून 35 किलोमीटर एवढ्या लांब अंतरावरून लांब अंतरावरून जाणार असल्यामुळे पंढरपूर या त्यांच्या कर्मभूमीच्या विकासाला त्याचा उपयोग होणार नाही त्यामुळे पंढरपूर शहर व मतदार संघातील जनतेच्या रोशाला त्यांना निश्चित सामोरे जावे लागेल! या बाबीचा त्यांनी विचार करावा*.
*प्रा.संग्रामदादा चव्हाण*
*माजी जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस*
