वर्षानुवर्षे रखडलेल्या, गार्डी येथील बाळू पाटील वस्ती ते जि प प्रा.शाळा फाटे वस्ती येथील रस्त्याचे काम लागले मार्गी!
*(शिवसेना उपजिल्हाप्रमुख सत्यवान (नाना) मोरे यांच्या अथक प्रयत्नामुळे सर्व शेतकऱ्यांना मिळाला मोठा आधार)*
*(ग्रामपंचायत हद्दीतील रस्ता केला पोलीस संरक्षणामध्ये पूर्ण; आबाल वृद्धांचे मिळाले सत्यवान (नाना) मोरे यांना आशीर्वाद)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील गार्डी येथील बहुचर्चित अशा, भाळवणी रोड ते फाटे वस्ती या ठिकाणचे रस्त्याचे काम सोलापूर जिल्हा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख माननीय सत्यवान नाना मोरे यांच्या विशेष प्रयत्नामुळे व पाठपुरामुळे व अथक परिश्रमामुळे आज पूर्ण करण्यात आले! याचबरोबर या कामासाठी मा. सुनील साळुंखे (बुवा), व अण्णासाहेब साळुंखे (आप्पा) यांनीही महत्त्वाची भूमिका या कामांमध्ये पार पाडली.. *”रस्त्याची जवळजवळ येथील नागरिकांकडून बऱ्याच वर्षापासून मागणी होत होती”*. वर्षानुवर्ष झाले तरी हे काम होत नव्हते;पण सद्यस्थितीला हे काम झाले असून या रस्त्यासाठी अनेक जणांनी कामांमध्ये मोठा खोडा घालून हे काम थांबवण्याचा प्रयत्न केला पण अखेर आज सत्याचा विजय झाला असून या कामाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे!
याबाबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख सत्यवान (नाना) मोरे यांनी सातत्याने यासाठी पाठपुरावा करून सोलापूर येथे जाऊन सोलापूर जिल्ह्याचे पोलीसप्रमुख अतुल कुलकर्णीसाहेब यांच्याकडून रीतसर परवानगी घेऊन व पोलीस संरक्षण घेऊन हा रस्ता पूर्णत्वास नेला! या रस्त्यासाठी पंढरपूर तालुका ग्रामीण पोलिसांचे व पंढरपूरचे तत्कालीन गटविकास अधिकारी त्याचबरोबर पंढरपूर तहसील कार्यालयाचे कर्तव्यदक्ष तहसीलदार साहेब यांचेही मोठे सहकार्य पाहायला मिळाले!
हा रस्ता झाल्यामुळे येणाऱ्या आगामी पावसाचा काळामध्ये येथील वस्तीवरून ये जा करणाऱ्या शालेय विद्यार्थी व आबाल वृद्धांची सोय झाली आहे! याच्या अगोदर या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे येथील भागातील वस्तीवरील नागरिकांना गावाकडे व पंढरपूर कडे जाण्यासाठी मोठी गैरसोय निर्माण होत होती याचा अनुषंगाने आपले कर्तव्य समजून शिवसेना उपजिल्हाप्रमुख सत्यवान (नाना) मोरे यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा रस्ता पूर्णत्वास नेऊन येथील सर्व नागरिकांची मोठी सोय केली असल्याचे येथील वाड्यावर वस्तावरील सर्व नागरिकांनी आमच्याशी बोलताना सांगितले! या रस्त्यामुळे गार्डी गावाला व परिसराला एक विकास पुरुष मिळाला असून आगामी काळामध्ये राहिलेल्या सर्व रस्त्यांची व विविध विकासाची कामे करण्याचा निश्चय शिवसेना उपजिल्हाप्रमुख माननीय .सत्यवान (नाना) मोरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.

