*(शक्तीपीठ महामार्ग रोखण्यासाठी दिनांक 18 जुलै रोजी पंढरपूरात, सदबुद्धी दिंडी होणार!)*
*(सदबुद्धी दिंडी सोहळ्यास, महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांसह शेतकऱ्यांची एकजूट पाहायला मिळणार)*
*(मा खासदार राजू शेट्टी, सतेज उर्फ बंटी पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील, कॉर्मेड गिरीश फोंडे, उमेश राजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द व्हावा, या मागणीसाठी आता विठ्ठलाकडे साकडे घालावे लागणार आहे. यासाठी मराठवाड्यातील सहा जिल्ह्यातील शेतकरी १८ जुलै रोजी पंढरपूर येथे एकत्र येणार आहेत.
आषाढी एकादशी निमित्त् बाधित शेतकरी एकत्र येणार असून पंढरपूर येथील वारकरी मैदानात शेतकऱ्यांची सभा घेतली जाणार आहे.
राज्यातील सुपीक शेतजमीन, बागायती क्षेत्र आणि शेतकऱ्यांची घरे शक्तिपीठ महामार्गामुळे उद्ध्वस्त होणार आहेत. या विनाशकारी महामार्गाला राज्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून, हा प्रकल्प पूर्णपणे रद्द करावा या मागणीसाठी आता आंदोलनाचा पुढील टप्पा कोल्हापूरमधून जाहीर करण्यात आला आहे. यास मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला असल्याचे लातूरमधील समन्वयक ॲड्. गजेंद्र येळकर यांनी कळवले आहे.
आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपुरात येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील १३ जिल्ह्यांतील शेतकरी पंढरपुरात विठ्ठल चरणी एकत्र येत आहेत.

या सदबुध्दी यात्रेस राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील , विधान परिषदेचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील , खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार प्रणितीताई शिंदे , महादेव जानकर , आमदार कैलास पाटील , कॉम्रेड गिरीश फोंडे , उमेश राजेनिंबाळकर यांच्यासह वरील सर्व जिल्ह्यातील शक्तीपीठ विरोधी विविध पक्षांचे आमदार खासदार यात्रेस उपस्थित राहणार आहेत.