
केंद्रीय संचार ब्यूरो कार्यालयाच्या प्रांगणात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न
सोलापूर केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो सोलापूर कार्यालयाच्या प्रांगणात ७६ वा प्रजासत्ताक दिनाचा शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माजी प्रसिद्धी अधिकारी सतीश घोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
यावेळी सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव, उद्योजक विरेश नसले, कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, शशीकांत यादव आणि रोहित यादव आदी मान्यवर उपस्थित होते.