
संत दामाजी साखर कारखान्यावर प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर दि।२६
जानेवारी २०२५ रोजी ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमीत्ताने चेअरमन श्री
शिवानंद यशवंत पाटील यांचे हस्ते ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न झाला। सदर
प्रसंगी सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे प्रतिमेचे पुजन
चेअरमन श्री शिवानंद पाटील, व मा।संचालक मंडळ सदस्यांचे हस्ते संपन्न
झाले। कार्यक्रमाचे सुरुवातीस उपस्थितांचे स्वागत व प्रास्तावीक
प्र।कार्यकारी संचालक श्री रमेश जायभाय यांनी केले व त्यांनी स्वातंत्र्य
दिनाच्या निमीत्ताने शुभेच्छा व्यक्त केल्या।
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना चेअरमन श्री शिवानंद पाटील
म्हणाले, अनेक थोर महात्म्यांनी भारत देश स्वतंत्र केला आहे। आज
प्रत्येक क्षेत्रामध्ये भारत देशाने प्रगती केलेली आहे। विकासाच्या
बाबतीत आपला भारत देश जगामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे। अनेक देशांमध्ये
आपले भारतीय नागरीक, विद्यार्थी आपल्या देशाचा लौकिक वाढवताना दिसत आहेत।
स्व।यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ वाढविली।
कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व।मारवाडी वकील साहेब, संस्थापक
व्हा।चेअरमन स्व।रतनचंद शहा शेठजी यांनी ही संस्था उभारली आहे।
स्व।चरणुकाका पाटील यांचेही या संस्थेला चांगले सहकार्य लाभले आहे।
त्यांचा आदर्श घेवून ही संस्था चांगल्या प्रकारे चालविणेसाठी हे संचालक
मंडळ प्रयत्न करीत आहे। कारखान्याचे विद्यमान व्हा।चेअरमन श्री।तानाजीभाऊ
खरात, संचालक मंडळ व आपणा सर्वांच्या सहकार्याने ऊस उत्पादक शेतकÅयांची
बिले, तोडणी वाहतुक यंत्रणेची बिले व कामगार पगार वेळेवर करुन हंगाम
यशस्वी पार पाडले आहेत। चालू गळीत हंगामही संचालक मंडळ, सभासद-शेतकरी,
अधिकारी, कामगार यांच्या सहकार्यातून यशस्वी करणार आहोत अशी ग्वाही देवून
प्रजासत्ताक दिनाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी विलासराव देशमुख
प्रशालेचे विद्यार्थ्यांनी कवायत संचलन सादर केले। तसेच सदर प्रशालेचे
विद्यार्थी सोनाक्षी रणे, प्रियांका कोळेकर, शृतीका विभूते, पे्ररणा
गडदे, सोहम राजमाने, विक्रम पाटील यांनी देशभक्तीपर मनोगत याप्रसंगी
व्यक्त केले।
ध्वजारोहन कार्यक्रमानंतर कारखान्याने उभारणी केलेल्या नविन १००
टन क्षमता असलेल्या वजन काट्याचे पुजन कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद
पाटील व संचालक मंडळाचे हस्ते पार पडले। सदरच्या वजन काट्यामुळे
कारखान्यात उत्पादन झालेल्या जादा वजन असलेल्या मोलासेस, साखर अशा मालाचे
वजन करणे सोईचे होणार आहे। तसेच पहिला ६० टनी क्षमतेचा असलेल्या वजन
काटयामध्ये अडचणी आल्यास या काटयाचा उपयोग ऊसाचे वजन करणेसाठी होणार आहे।
ऊसाने भरलेल्या बैलगाडीचे वजन करणेसाठी असलेल्या पूर्वीच्या १० टनी वजन
काट्याचे ठिकाणी हा नविन काटा उभारणी केला असलेने याचा काट्याचा चांगला
उपयोग होणार असलेचे कार्यकारी संचालक श्री।रमेश जायभाय यांनी सांगीतले।
सदर प्रसंगी व्हा।चेअरमन श्री तानाजीभाऊ खरात, संचालक सर्वश्री
मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील,
भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा
दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे,
तानाजी कांबळे, सौ।निर्मला तानाजी काकडे, सौ।लता सुरेश कोळेकर, विलासराव
देशमुख प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच कारखान्याचे चिफ इंजिनिअर
सचिन गुंड, चिफ अकौंटंट रमेश गणेशकर, मुख्य शेती अधिकारी कृष्णात ठवरे,
कार्यालयीन अधिक्षक दगडू फटे, लेबर आùफिसर आप्पासोा शिनगारे, स्टोअरकिपर
उत्तम भुसे, पर्चेस आùफिसर संदिप इंगोले, ई।डी।पी।मùनेजर मनोज चेळेकर,
केनयार्ड सुपरवायझर प्रकाश पाटील, सुरक्षा अधिकारी लक्ष्मण बेदरे,
विभागप्रमुख, कर्मचारी, कामगार संघटना अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, कामगार
पतसंस्था चेअरमन विश्वास सावंजी, संघटना व पतसंस्थेचे पदाधिकारी उपस्थित
होते।
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोक उन्हाळे यांनी केले