
स्वेरी काॅलेज ऑफ इंजिनिअर गोपाळपूर यांच्यावतीने जागतिक पशु उद्योग दिनानिमित्त तांत्रिक परिसंवादाचे आयोजन!
(या परिसंवादासाठी डॉ. मंगेश घाडीगावकर व डॉ. संतोष वाघचौरे यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन होणार)
शेवरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग गोपाळपूर यांच्यावतीने दिनांक 27 4 2025 रविवार रोजी जागतिक पशुवैद्य दिनाच्या निमित्ताने स्वेरी कॉलेज गोपाळपूर येथे तांत्रिक परिसंवाद व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी व्हेटिना हेल्थ-केअर सेंटरचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ मंगेश घाडीगावकर व जिओ प्लॅटफॉर्म मुंबई चे जनरल मॅनेजर डॉ. संतोष वाघचौरे यांचे महत्त्वपूर्ण असे व्याख्यान होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ. महेश बनसोडे, यांचे “किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी पशुवैद्यकांपुढील आव्हाने, व “कृत्रिम बुद्धिमत्तेचा फायदेशीर दुग्ध व्यवसायासाठी वापर” या विषयावर परिसंवाद आयोजित केला असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शितल कुमार मुकणे व स्वेरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे प्राचार्य डॉ बी-पी रोंगे सर यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पशुसंवर्धन विभागाची प्रादेशिक सह आयुक्त पुणे मा. डॉ समीर बोरकर, हे अध्यक्ष स्थान भूषवणार आहेत.
या कार्यक्रमास माझी सहसंचालक पशुसंवर्धन विभाग डॉ. सी आर कापडी उपायुक्त, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर अंकुश परिहार सातारा विभागाचे उपायुक्त डॉ दिनकर बोंडे माजी उपयुक्त पशुसंवर्धन विभाग सोलापूर विशाल येवले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सोलापूर डॉ. नवनाथ नरळे, सह आयुक्त सांगली या. डॉ. विजय ढोके सोलापूरचे सह आयुक्त डॉ. भास्कर पराडे, हे प्रमुख उपस्थिती लावणार असून हा कार्यक्रम शेवरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग गोपाळपूर येथे सकाळी ठीक ०९ वाजता सुरू होणार असून यासाठी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये काम केलेल्या सर्व अधिकारी पदाधिकारी व सर्व डॉ. मंडळींनी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे विनीत डॉ. विश्वासराव मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे जाहीर केले आहे.