
सरस्वती विद्यालय व कर्मविर भीमराव महाडीक कनिष्ठ महाविद्यालयात “प्रजासत्ताक दिन” विविध उपक्रमाने साजरा!
सरस्वती विद्यालय व कर्मविर भीमराव महाडीक कनिष्ठ महाविद्यालय टाकळी सिकंदर येथे 26 जानेवारी 2025 “प्रजासत्ताक दिन” विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.
“प्रजासत्ताक दिना” निम्मीत
मार्च 2024 मध्ये इयत्ता 12 वी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थीनी कु.दिशा खंडू कदम हिच्या शुभास्ते “ध्वजारोहण ” करण्यात आले.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा श्री सुधीर (आबा ) भोसले हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.”ध्वजारोहण” नंतर विविध उपक्रम राबविण्यात आले.
यामध्ये “खडी कवायत” “बैठे कवायत” प्रकार घेण्यात आले .तसेच संकुलातील अनेक विद्यार्थ्यानी “प्रजासत्ताक दिना ” निम्मीत आपले मनोगत व्यक्त केले.
संकुलातील सर्व विभागानी वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी दिली. यावेळी संकुलाचे प्राचार्य
मा.श्री राजीव यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख मा.श्री परमेश्वर गायकवाड यांनी केले तर आभार श्री बापूसाहेब बाबर यांनी मानले.
यावेळी शाळेचे माझी विद्यार्थी व पालक मा.श्री नितिन चव्हाण, मा.श्री सचिन चव्हाण,श्री धनाजी जाधव, सामाजिक कार्यकर्त्या मा.सौ मंगलताई ओहोळ तसेच उदयोन्मुख उद्योजक मा.श्री अंगद बाबर संकुलाचे पर्यवेक्षक मा श्री अशोक जाधव सर्व शिक्षक/ शिक्षिका व सेवक, पालक, माजी विद्यार्थी संकुलातील सर्व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे देखणे नियोजन संकुलाचे शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख मा.श्री मंगेश मोरे व श्री तानाजी जावळे यांनी केले होते. सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
साकारण्यात संकुलाचया सहशिक्षीका श्रीम.अनिता घोडके ,श्रीम संगीता जमादार श्रीम. विद्या चव्हाण तसेच
श्रीम.अनिता दळवी यांचा अत्यंत मोलाचा सहभाग होता.