अभिजीत (आबा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाडीकुरोली ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम
(वाडीकुरोलीत संचालक धनंजय काळे यांच्यासह ५०ते ६०रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात नोंदवला सहभाग)
(ग्रामस्थांनी अभिजीत आबा पाटील यांना माढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी घेण्याची केली मागणी)
पंढरपूर तालुक्याचे तरुण तडफदार नेतृत्व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यात विविध ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने वाडीकुरोली या गावांमध्ये भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले आहे.
तरी यामध्ये तब्बल ५० ते ६० रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले व हे शिबिर मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले.
यावेळी विठ्ठल कारखान्याचे संचालक धनंजय काळे, सचिन काळे, दादासो काळे, विठ्ठल काळे, मधुकर काळे, विजय पाटील,मधुकर पाटील, कांतीलाल नाईकनवरे, बाबासो काळे, पांडुरंग काळे,बाळासो काळे, नागेश काळे, कुमार काळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते व अभिजीत (आबा) पाटील यांच्यावर प्रेम करणारे समर्थक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
चौकट
विठ्ठल कारखान्याचे अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाडीकुरोली येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले यामध्ये ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला तसेत अभिजीत (आबा) पाटील हे माढा मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व करावे, अशा शुभेच्छा दिल्या.
-संचालक धनंजय काळे