माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी घेतली शरदचंद्र पवार साहेबांची भेट!
(पुणे येथील मोदी बागेमध्ये झालेल्या भेटीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघाबरोबरच माढा विधानसभा मतदारसंघाचा घेतला पवार साहेबांनी आढावा!)
(माढा विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा भाकरी फिरणार!)
माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी व त्यांचे सुपुत्र सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रंजीत भैय्या शिंदे आज पुणे येथील मोदी बागेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व खासदार शरद चंद्र पवार साहेबांची भेट घेतली असून या भेटी मुळे सोलापूर जिल्ह्यात उलटसोड चर्चेला उधाण आले आहे. या भेटी मागे जरी काही राजकीय शिजत नसले तरी पवार साहेबांची भेट घेणे म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का असल्याचे बोलले जात आहे.
यामुळे पुन्हा एकदा माढा विधानसभा मतदारसंघाची चर्चा सर्व मीडियामध्ये रंगली आणून या भेटीमागे नक्की काय चर्चा झाली याबाबत दरीत समजले नसले तरी अनेक कारणे असू शकतात असे त्यांच्या निकटवर्तीयाकडुन सांगितले जात आहे.
माढा विधानसभा मतदारसंघासाठी अनेकजण जरी इच्छुक असले माढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुती मध्ये टक्कर होणार असून यामध्ये महायुतीकडून तरी सध्याच्या स्थितीला रणजीत भैय्या शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.त्यानंतर महाविकास आघाडी कडून अनेक जण इच्छुक असून, विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील त्याचबरोबर सौमिनल ताई साठे, शिवाजी नाना कांबळे, शिवतेजबाबा मोहिते पाटील, आणि आणि बरेच जण पंढरपूर तालुक्यातील इच्छुक आहेत. पण अखेर माढा विधानसभा मतदारसंघातून नेतृत्व आहे आमदार बबनदादा शिंदे व सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीत भैया शिंदे यांच्याकडे येणार असून आम्ही रणजितभैया शिंदे यांच्याशिवाय कोणालाही विधानसभेत आमदार म्हणून पाहू शकत नाही अशी प्रतिक्रिया काही शिंदे समर्थकांनी आज आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.