
करमाळा अर्बन बँकेसाठी प्रा. रामदास झोळ यांनी उभा केलेल्या पॅनलमधील १५ पैकी ३ जणांचे अर्ज अवैद्य!
(आमच्या पॅनलचे लवकरच राहिलेले सर्व अर्ज वैध होणार:- प्रा. रामदास झोळ)
अवैध अर्ज झाल्याबाबत निबंधक ऑफिस सोलापूर येथे अपील करणार:प्रा.रामदास झोळ
करमाळा अर्बन बँकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून यासाठी प्राध्यापक रामदास झोळ यांनी करमाळा अर्बन बँकेसाठी पॅनल उभा केले आहे.
करमाळा अर्बन बँकेसाठी प्रा. रामदास झोळ यांनी उभा केलेल्या पॅनलमधील १५ पैकी ३ जणांचे उमेदवारी अर्ज अवैद्य ठरले आहेत तरी याबाबत सोलापूर येथे अपील करणार असल्याची माहिती प्राध्यापक रामदास झोळ यांच्याकडून प्रसिद्धी पत्रद्वारे देण्यात आली आहे.