
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त टाकळी सिकंदर येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून जयंती साजरी!
(खासदार प्रणिती शिंदे, आमदार राजू खरे व उमेशदादा पाटील यांनी केले भीमराव वसेकर यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक)
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त टाकळी सिकंदर येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे, आमदार राजू खरे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेशदादा पाटील यांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त टाकळी सिकंदर येथे भव्य दिव्य मिळवणूकीला प्रारंभ करण्यात आला.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कामाबद्दल आणि शैक्षणिक क्रांती बद्दल दिलेल्या योगदान याबाबत महत्व पटवून दिले.
यावेळी 12 एप्रिल रोजी डॉ.काणेज गायत्री हॉस्पिटल पंढरपूर व आरोग्य उपकेंद्र टाकळी सिकंदर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते
यावेळी 51 जनांनी रक्तदान केले तर टाकळी सिकंदर परिसरातील 400 ते 450 जनांनी विविध आजारांवर आरोग्य तपासणी केली.
याप्रसंगी मोहोळचे आमदार राजू खरे,शिवसेनेचे चरणराज चवरे, रमेश बारस्कर, शंकर वाघमारे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, युवा नेते पृथ्वीराज डोंगरे, सर्जेराव चवरे, डॉ.वर्षाताई काणे,शिवाजीराव चव्हाण, प्रशांत वसेकर,नाना सोनटक्के ब्रम्हदेव वसेकर,सिराज तांबोळी,अजित चव्हाण, मनोहर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.