
करमाळा अर्बन बँकेच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या जाचक नियमांमध्ये शिथीलता आणावी अन्यथा कायदेशीर मार्गाने न्याय मागितला जाईल.:प्रा. रामदास झोळ सर
करमाळा अर्बन सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली आहे. सदर बॅंकेच्या संचालक पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11/04/25 आहे. परंतु सदरची बँक 2022 पासून आजतागायत रिझर्व बँकेच्या निर्बंधामुळे बंद आहे. बँकेचे आर्थिक व्यवहार बंद आहेत. सदर संचालक मंडळाची उमेदवारी अर्ज करण्यासाठीची पात्रता ही खालील प्रमाणे आहे.
1. शेअर्स रक्कम 5000 पूर्ण असावी.
2. सदर व्यक्तीच्या नावे बँकेत 25 हजार रुपये डिपॉझिट असावे.
परंतु वरील दोन्हीही अटीतील रकमा भरण्यासाठी या रिझर्व बँकेच्या निर्बंधामुळे बँकेत भरता येत नाहीत त्यामुळे उमेदवारी अर्ज भरता येत नाही. तरी आपणास आमची विनंती आहे की सदर रकमा भरण्याच्या अटी रद्द / शिथिल करण्यात याव्यात अथवा वरील दोन्ही रकमा भरण्याची पर्यायी व्यवस्था करून देण्यात यावी.
याबाबत प्रा. रामदास झोळ यांनी सहकार निवडणूक प्राधिकरण चे कवडे साहेब, डी डी आर सोलापूर चे गायकवाड साहेब, अर्बन बँकेचे प्रशासक डोके साहेब, निवडणूक निर्णय अधिकारी ए आर शिंदे, सहकार मंत्र्यांचे सचिव जाधव साहेब या सर्वांची भेट घेऊन चर्चा करून मार्ग काढण्यासंदर्भात मागणी केली आहे. या गोष्टीवर उद्या मार्ग निघणे अपेक्षित आहे अथवा कायदेशीर रित्या न्यायालयीन मार्गाने न्याय घ्यावा लागेल. असेही यावेळी झोळ सर यांनी सांगितले.