मोहोळ तालुक्यात अप्पर तहसील कार्यालयाच्या स्थलांतरावरून पहिल्यांदाच पाहायला मिळाली विरोधकांची एकजूट
उमेश दादा पाटील यांच्या सर्व समर्थकांच्या विरोधी भूमिकेमुळेच मोहोळ तहसील कार्यालयाला मिळाला स्थगिती आदेश!
मुख्यमंत्र्यांनी दिलेली स्थगिती उठवण्यासाठी अनगरकर पाटील कोणत्याही थराला जाऊ शकतील:- उमेशदादा पाटील
खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधी भुमिकेमुळे अप्पर तहसील कार्यालयाच्या स्थगितीला मिळाले मोठे पाठबळ
अनगर येथे स्थलांतरित करण्यात येत असलेल्या अपर तहसील कार्यालयाला, मोहोळ तालुक्यातील व शहरातील सर्वपक्षीय गटबंधन एकत्र आल्यामुळे व विरोधाचे धार मोठी असल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्या मुळे अनगर येथे जाणारे तहसील कार्यालय आता स्थगित झाले असून, याचा स्थगिती आदेश प्राप्त झाल्यामुळे मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील व यशवंत तात्या माने यांच्या विरोधी गटाने मोठा मोहोळ शहरात जल्लोष केला!
यावेळी पहिल्यांदाच मोहोळ तालुक्यात अप्पर तहसील कार्यालयाच्या स्थगितीवरून विरोधकांची एकजूट पहिल्यांदाच पाहायला मिळाली.
भाजपाचे ज्येष्ठ नेते मनोहर भाऊ डोंगरे अर्थ बांधकाम समिती सभापती विजय दादा डोंगरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश दादा पाटील, संतोष अण्णा पाटील, संजय अण्णा क्षीरसागर चरणराज चवरे, मोहोळ तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, सुशील भैया क्षीरसागर सोमेश शिरसागर, सौ. सीमाताई पाटील, काकासाहेब देशमुख, प्रभाकरभैय्या देशमुख, महेश देशमुख याचबरोबर सर्व पक्षातील प्रमुख नेते मंडळी बरोबरच इतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोठा विरोध केल्यामुळे अखेर महाराष्ट्र शासनाला या विषयासाठी स्थगिती द्यावी लागले असून या स्थगिती आदेशामुळे मोहोळ येथील अपर तहसील कार्यालय हे मोहोळ येथे राहणार आहे.
यासाठी मोहोळ तालुक्यातील अनगरकर पाटील यांच्या विरोधात त सर्व पक्षातील सर्व नेते मंडळींनी हा लढा उभा केल्या मुळे सर्वसामान्य नागरिकांमधून व शेतकऱ्यांमधून या नेते मंडळींचे अभिनंदन करण्यात येत आहे. आठ ते नऊ दिवस सुरू असलेल्या या तहसील कार्यालयाच्या गोंधळावरून एकंदरीत मोहोळ तालुका पूर्णपणे ढवळून निघाला होता तर माजी आमदार राजन पाटील व आमदार यशवंत माने यांच्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांनी अनगर येथे हे शासकीय कार्यालय लवकर लवकर अनगरेचे सुरू करावी यासाठी मीटिंग घेतली होती यावेळी या मीटिंगमध्ये पुळूज पंचायत समिती गणाच्या सदस्या व शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मुबिना मुलांनी यांनी विरोध केल्यामुळे, हे अप्पर तहसील कार्यालयाच्या स्थगित आदेश प्राप्त झाले असल्याचे बोलले जात आहे.
चौकट
जरी मोहोळ येथील अप्पर तहसील कार्यालय समिती मिळालेली असली तरीसुद्धा नगरकर पाटील हे अहंकारी वृत्तीचे असून ती ही स्थगिते आदेश उठवण्यासाठी कोणते स्तराला जाऊ शकतात व जरी त्यांनी काही केल्यास पुन्हा आम्ही सर्वजण एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात विरोध करून हे तहसील कार्यालय मोहोळ येथे कसे राहता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे.
उमेश दादा पाटील
मुख्य प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष