
चरणराज चवरे यांच्या जिल्हा नियोजन फंडातून टाकळी सिकंदर येथे १० लाखांच्या काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन
(नागरिकांतून चरणराज चवरे यांच्या कामाचे कौतुक तर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची केली कामे)
अगदी कमी कालावधीत समाजकारणाची आवड असणारे चरणराज चवरे यांना राजकारणाचा कोणताही वारसा किंवा गंध नसताना गोरगरीब कष्टकरी जनतेची कामे करून सर्वसाधारण कार्यकर्ता असताना आपल्या कामाच्या जोरावर स्वतःची ओळख कामातून तयार करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वसनीय कार्यकर्ते म्हणून काम करत राहिले व कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झाले त्यांनी याचा पुरेपूर वापर करून मोहोळ तालुक्यातील सर्व गावांना विकास निधी देण्याचा प्रयत्न केला आहे.
सिकंदर टाकळी (ता.मोहोळ) येथे दि.२० रोजी माळी,वसेकर वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणेसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या जिल्हा नियोजन फंडातून 10 लाखाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.त्यावेळी ग्रामस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गावातील व शिवसेनेचे विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी टाकळी सिकंदरचे सरपंच नाना सोनटक्के,सदस्य ब्रह्मदेव वसेकर,ज्ञानेश्वर वसेकर,धर्मराज वसेकर,सिद्धेश्वर अनुसे ,अनिल वसेकर,महादेव वसेकर गुरुजी,भाऊराव वसेकर,बाळासाहेब वसेकर,औदुंबर शिंदे उपळाई बुद्रुकचे सरपंच,पोलीस पाटील रामचंद्र वसेकर,प्रशांत वसेकर,संतोष चव्हाण,पै.बाळासाहेब चवरे,अमोल चवरे,जमीर मुजावर,महेश वसेकर,ज्योतीराम चव्हाण,मधुकर वसेकर,सैपन सय्यद,शंकर वसेकर,संजय वसेकर,संदीप डोंगरे,पांडुरंग चव्हाण,कालिदास वसेकर,पांडुरंग सातपुते,प्रथमेश वसेकर,स्वप्निल डोंगरे,हिम्मत वसेकर,तुकाराम वसेकर,बाबुराव वसेकर,दीपक वसेकर,वैभव वसेकर,तात्या वसेकर, मारुती चवरे,नितीन सोनटक्के,धोंडीराम चव्हाण,शुभम वसेकर . निलेश वसेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
मोहोळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये विकास कामे करून जनतेची सेवा करणार!
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कॅबिनेट मंत्री भरत शेट गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे देखील येणाऱ्या काळामध्ये पाटकूल,टाकळी सिकंदर तथा मोहोळ तालुज्यातील सर्व गावांना जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करणार व ग्रामस्थांच्या अडचणी सोडवणार तसेच मोहोळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये विकास कामे करून जनतेची सेवा करणार.
चरणराज चवरे,शिवसेना जिल्हाप्रमुख